10 वीच्या विद्यार्थांना परीक्षेसाठी दिला यशाचा कानमंत्र
लातूर (प्रतिनिधी) : ढगेज् इंग्लिश अकॅडमी लातूर येथे नुकताच इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व पालक मेळावा उत्साहात संपन्न झाला यावेळी ढगेज् इंग्लिश अकॅडमीतील इंग्रजी विषयाच्या वर्षभरातील सर्व परीक्षांमध्ये टॉपर्स असणाऱ्या 80 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांसह सन्मानित करण्यात आले.
तसेच परीक्षेला सामोरे जाताना निर्भीडपणे आणि तणावमुक्त वातावरणात परीक्षा देऊन ढगेज् इंग्लिश अकॅडमीच्या इंग्रजी विषयाच्या गुणवत्तेची परंपरा कायम ठेवण्याचा दृढसंकल्प केल्याची भावना यावेळी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना व्यक्त केली तसेच या निरोप समारंभाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. सत्यशील सावंत प्रा. व्यंकटराव ढगे ,प्रा. सच्चिदानंद ढगे, प्रा.विवेकानंद ढगे,प्रा. संभाजी नवघरे ,प्रा.नागापुरे सर , पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते .यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना व पालकांना ढगेज् इंग्लिश अकॅडमीचे प्राध्यापक सच्चिदानंद ढगे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले तसेच पंकजाचे प्राध्यापक सत्यशील सावंत यांनीही विद्यार्थ्यांना प्रेरणादायी स्वरूपाची मार्गदर्शन केले नागापुरे यांनीही विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या या सेंड ऑफ कार्यक्रममध्ये संभाव्य , विद्यार्थी त्यांची वर्षभराची गुणवत्ता पाहून त्यांनी येणाऱ्या दहावीच्या परीक्षेमध्ये 95 पेक्षा जास्त गुण घेऊ शकतात इंग्रजी विषयात शंभर पैकी अशा सगळ्या विद्यार्थ्यांचे सुद्धा सत्कार करण्यात आला.व हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंगळे सर, अमर,घोलप आदिंनी परिश्रम घेतले .सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्राध्यापक विवेकानंद ढगे यांनी व्यक्त केले.