राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या भक्ती स्थळाचा तीर्थक्षेत्र म्हणून सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबध्द- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

0
राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या भक्ती स्थळाचा तीर्थक्षेत्र म्हणून सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबध्द- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या भक्ती स्थळाचा तीर्थक्षेत्र म्हणून सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबध्द- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

समाधी लिंग स्थापना सोहळ्यास शोभा यात्रेने आरंभ

अहमदपूर (गोविंद काळे) : राष्ट्रसंत, परमपूज्य, डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे कार्य राष्ट्रहितासाठी प्रेरक व ऊर्जा स्तोत्र असल्याचे सांगून जीवनभर त्यांनी समर्पण भावनेने समाजाच्या हितासाठी शेवटच्या श्वासापर्यंत सकारात्मक काम केले म्हणून त्यांच्या समाधीचे दर्शन घेण्याच्या योगाने मनाला प्रसन्नता मिळाली. त्यामुळे येणाऱ्या काळात भक्ती स्थळाचा तीर्थक्षेत्र म्हणून सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबध्द असून भक्ती स्थळासाठी पर्यटन विभागामार्फत राज्य शासनाने प्रस्ताव पाठवावा व तो मी तात्काळ मंजूर करणार असल्याचे सांगून, भक्ती स्थळावरील सर्विस रोड व महामार्गाच्या वतीने बस थांबे करून भावीकाची सोय करणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी केली
ते दि. 23 रोजी भक्ती स्थळ येथे वसुंधरारत्न, राष्ट्रसंत, परमपूज्य, सद्गुरु, डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज संजीवन समाधी शिवलिंग प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रसंताचे उत्तर अधिकारी व वीरमठ संस्थांचे मठाधिपती परमपूज्य राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज हे होते. यावेळी डॉ वीरूपक्ष शिवाचार्य महाराज, मनमत धाम महाराज मांजरसुंबा, डॉ नीलकंठ शिवाचार्य महाराज धारेश्वरकर, संगम बसप्पा महाराज, आचार्य गुरुराज स्वामी महाराज, अभिषेक शिवाचार्य बुद्धि स्वामी मठ हडोळती सह क्रीडा युवक कल्याण व बंदरे मंत्री नामदार संजय बनसोडे, खासदार सुधाकरराव शृंगारे ,आमदार बाबासाहेब पाटील, शिवा संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे, माजी मंत्री बाळासाहेब जाधव, माजी मंत्री विनायकराव पाटील, भाजपाचे प्रदेशाचे प्रवक्ते गणेश दादा हाके, माजी आमदार बब्रुवाहन खंदाडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना नामदार नितीन गडकरी म्हणाले की, यापूर्वी मी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रसंताची भेट घेतल्याचे सांगून त्यांचे बालपणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अत्यंत उल्लेखनीय काम केले असून ते या भागाचे अत्यंत त्यागी, तपस्वी, राष्ट्रभक्ती व्यक्तिमत्व होते. त्यांना 104 वर्षाचे आयुर्मान लाभलं. त्यात त्यांनी शंभर वर्ष समाजाची अत्यंत प्रामाणिकपणे सेवा केली. शरीराने आपल्यामध्ये नसले तरी ते आत्मरूपाने भक्ती स्थळावर असल्याचे सांगून त्यांच्या विचाराचा जागर तरुणाईने घ्यावा असे जाहीर आवाहन केले.
संजीवन समाधी शिवलिंग प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने भक्ती स्थळाचे प्रमुख आचार्य गुरुराज स्वामी, वीरमट संस्थानचे मठाधिपती परमपूज्य राजशेकर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज, परमपूज्य डॉक्टर अभिषेक शिवाचार्य महाराज यांची सजवलेल्या रथामध्ये वीरमठ संस्थान पासून शहराच्या प्रमुख मार्गावरून भव्य शोभायात्रा भक्ती स्थळापर्यंत काढण्यात आली.
या शोभा यात्रेत यशवंत विद्यालयाचे स्काऊट पथक, संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे लेझीम पथक , कलशधारी महिला, झांजपथक, लेझीम पथक, इतिहासकालीन परंपरा, वाद्य यांच्यासह जिवंत देखावे महादेव, पार्वती, गणपती, छत्रपती शिवाजी महाराज, समतेचा संदेश देणारे महात्मा बसवेश्वर यांच्यासह फेटाधारी महिला व पुरुष मंडळी नी अहमदपूरकरांचे लक्ष वेधून घेतले होते.
केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी प्रथम राष्ट्रसंत च्या समाधी मंदिर गाभाऱ्यातील समाधीचे दर्शन घेऊन संजीवन समाधीवरील शिवलिंग प्राणप्रतिष्ठापना धार्मिक पूजा विधी चा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला.
प्रारंभी भक्ती स्थळाच्या वतीने भक्ती स्थळाचे प्रमुख आचार्य गुरुराज स्वामी प्रा. मनोहर धोंडे, अध्यक्ष भगवंतराव पाटील चांभरगेकर, सचिव सुप्रियाताई गोटे, कोषाध्यक्ष सिद्धेश्वर मुन्ना पाटील, मनमत आप्पा पालापुरे, शिवप्रसाद कोरे, धन्यकुमार शिवणकर ,ऍडव्होकेट गंगाधर कोदले, एडवोकेट बाबुराव देशमुख व संयोजन समितीचे ओमप्रकाश पुणे, यांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
सोहळ्याचे प्रास्ताविक प्रा. मनोहर धोंडे यांनी सूत्रसंचालन रामलिंग तत्तापूरे यांनी तर आभार उमाकांत शेटे यांनी मांनले.
सोहळा यशस्वी करण्यासाठी शिवकुमार उटगे, राजकुमार कल्याणी, विनोद हिंगणे, एडवोकेट निखिल कासनाळे, अभय मिरकले, अनिल कासनाळे, सतीश लोहारे, रवी महाजन, संदीप चौधरी, राजकुमार पुणे, राहुल शिवपुजे, विठ्ठल गुडमे, मनमत प्रयाग, अश्विन आंधळे प्रा विश्वंभर स्वामी, प्राचार्य गजानन शिंदे, आशा रोडगे , उमा हामने, पवन वाले यांच्यासह संयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व लिंगेश्वर पाऊल मंडळ, गौरीशंकर पाऊल मंडळ, रुद्र महिला मंडळा सह शहरातील महिला मंडळांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *