लालबहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयामध्ये स्वयंशासन दिन साजरा
उदगीर (एल.पी.उगीले) : गाडगे महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी विद्यालयांमध्ये स्वयंशासन दिन अतिशय उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. एक दिवस संपूर्ण शाळा चालविण्याची जबाबदारी इयत्ता दहावी वर्गातील विद्यार्थ्यांना सोपविण्यात आली. या मागचा हेतू असा होता की, विद्यार्थ्यांना अध्यापन करीत असताना शिक्षकांविषयी चे खूप आकर्षण असते, व आदर असतो. आपणही एक दिवस शिक्षक व्हावे,अशी विद्यार्थ्यांची इच्छा असते, पण भविष्यामध्ये ही संधी प्रत्येक विद्यार्थ्याला मिळेलच असे नाही. याची जाणीव ठेवून लालबहादुर शास्त्री विद्यालयाने अतिशय उत्साहाने स्वयंशासन दिन साजरा केला. यामध्ये प्रथम सत्रामध्ये शाळेतून गुणानुक्रमे प्रथम आलेला विद्यार्थी संकेत कमलापूरे याला मुख्याध्यापक होण्याचा मान देण्यात आला. तर सर्वद्वितीय आलेले श्रद्धा कुलकर्णी व बालाजी पाटील यांनी उपमुख्याध्यापक पदाचे दायित्व सांभाळले.पर्यवेक्षक पदी कुणाल पाटील,पार्थ केंद्रे ,संध्या मदने,वैष्णवी वीरकपाळे यांनी कामकाज हाताळले.
परीक्षा विभाग निष्ठा भांगे,अभ्यासपूरक मंडळ प्रमुख मधूरा तेलंगे,क्रीडा शिक्षक सुयश देशपांडे,भागवत जाधव,शालेय पोषण आहार विनोद मुसने या विद्यार्थ्यांनी कुशलतेने व उत्साहाने विभाग हाताळले.या स्वयंशासन दिन उपक्रमात एकूण 200 विद्यार्थी शिक्षकांनी अध्यापन कार्य केले.सेवक म्हणून प्रेम सूर्यवंशी व त्यांच्या सहकारी मित्रांनी उत्तम कार्य केले. स्वयंशासन दिन उपक्रमाचे यशस्वी नियोजन दहावी प्रमुख रामेश्वर मालशेट्टे व सहप्रमुख लक्ष्मी चव्हाण यांनी केले.
समारोप प्रसंगी अध्यक्षस्थानी विराजीत असलेले संकुलाचे अध्यक्ष मधूकर वट्टमवार यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले . यावेळी विद्यार्थी मुख्याध्यापक संकेत कमलापुरे, विद्यार्थी उपमुख्याध्यापक बालाजी पाटील ,विद्यार्थी शिक्षक श्रद्धा उप्पे व शार्दूल साबणे यांनी अनुभव कथन केले.शिक्षक निरीक्षक अनिता यलमटे व निता मोरे यांनी दिवसभराचे विविध अनुभव सांगितले.
समारोप प्रसंगी संकुलाचे कार्यवाह शंकरराव लासूणे,मुख्याध्यापक अंबादास गायकवाड ,उपमुख्याध्यापक संजय कुलकर्णी ,पर्यवेक्षक कृष्णा मारावार,लालासाहेब गुळभिले माधव मठवाले,दहावी प्रमुख रामेश्वर मलशेट्टे मंचावर उपस्थित होते.
समारोप सत्राचे सूत्रसंचालन मधूरा तेलंगे,प्रास्ताविक श्रीकृष्ण धनगे,स्वागत परिचय भूमी सुडे ,आभार जनक बिरादार व वैयक्तिक गीत ऋतूजा पांचाळ, कल्याण मंत्र निष्ठा भांगे हीने गायले.