ज्ञानरचनावादी अध्यापक जनार्धन जाधव यांना टोलोसा विद्यापीठाची डाॅक्टरेट
उदगीर (एल.पी.उगीले) : लेखन, वाचन चळवळ, पर्यावरण रक्षक चळवळ, वृक्षारोपन ते वृक्षसंवर्धन, तंबाखूमुक्त शाळा व गावातील “एक विद्यार्थी एक झाड” असे उपक्रम राबविणारे शिवाय शिक्षण क्षेत्रात ज्ञानरचनावादावर अध्यापन करणारे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सदैव धडपडणारे विद्यार्थीप्रिय अध्यापक जनार्धन एकनाथराव जाधव यांना अमेरिकेतील टोलोसा विद्यापीठ मक्सिकोने अत्यंत सन्मानाची शिक्षण क्षेत्रातील गौरवाची डॉक्टरेट ही पदवी नुकतीच निजामाबाद येथील सिटी फँक्शन हॉल येथे टोलोसा विद्यापीठाचे इंडिया एंट्री डायरेक्टर डॉ. व्हि. कट्टाबोम्मान, कर्नाटक पशु वैद्यकीय विद्यतीठाचे प्रा. रामेश्वर बिजुरकर, चेन्नईचे सेन मास्टर डॉ के.ए. जनार्धनन आदींच्या हस्ते देण्यात आले.
शिक्षक जनार्धन एकनाथराव जाधव यांचे शैक्षणिक, सामाजिक, राष्ट्रीय कार्यामध्ये मोलाचे योगदान राहीले आहे. ते विद्यमान स्थितीत जिल्हा परिषद प्रशाळा देवर्जन ता. उदगीर येथे मराठी विषयाचे अध्यापक आहेत. त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये ३० वर्षे सेवा बजावाली असुन विद्यार्थ्यांना शिकविताना आधुनिक तंत्राचा वापर, दृक श्राव्य साधना सोबतच संगणकाच्या साहयाने, क्यु.आर. कोडच्या मदतीने अध्यापन करीत असतात.
यावेळी अवॉर्ड को-ऑर्डिनेटर रमेश बिगावकर, शिंदे मिलिंद, माणिकराव डोळे, जाकिर बाराहळ्ळी, सिमा गंगाराम, जगदिश हवाई, विलासराव, यांच्यासह मान्यवर प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.