लातूर जिल्ह्यात सर्वसामान्य मतदार शरदचंद्रजी पवार साहेबांसोबत – माजी मंत्री विनायकराव पाटील

0
लातूर जिल्ह्यात सर्वसामान्य मतदार शरदचंद्रजी पवार साहेबांसोबत - माजी मंत्री विनायकराव पाटील

लातूर जिल्ह्यात सर्वसामान्य मतदार शरदचंद्रजी पवार साहेबांसोबत - माजी मंत्री विनायकराव पाटील

उदगीर (एल पी उगिले) : लातूर जिल्ह्यातील बहुतांश मतदार हा ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारा सोबत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार यांनी स्थापन केलेला असताना देखील, निवडणूक आयोगाने त्यांनाच बेदखल करत पक्ष दुसऱ्या गटाकडे दिला. तसेच चिन्हही दुसऱ्या गटाला दिले. या अन्यायकारी घटनेमुळे सर्वसामान्य माणूस उद्विग्न झाला आहे. शरदचंद्रजी पवार यांच्या बद्दल प्रचंड सहानुभूती सर्वत्र निर्माण झाली आहे, आणि ही जनतेची चीड मतपेटीतून निश्चितपणे बाहेर पडेल, असे विचार माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी व्यक्त केले. ते उदगीर येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीच्या बैठकीत प्रमुख उपस्थित म्हणून बोलत होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे जिल्हाध्यक्ष संजय शेटे हे होते.या प्रसंगी माजी आमदार शिवराज तोंडचिरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष रशीद शेख, डॉ. बापूसाहेब पाटील, साजिद सय्यद, उदगीर तालुका अध्यक्ष शिवाजीराव मुळे, महिला जिल्हाध्यक्ष रेखाताई कदम, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष भरत सूर्यवंशी, युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष स्नेहा मोठे, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष इस्माईल लदाफ, युवक आघाडीचे प्रदेश सरचिटणीस निशांत वाघमारे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, सोमेश्वर कदम, शिवानंद भोसले, रामकिशन सोनकांबळे, निळकंठ पाटील, ज्येष्ठ नेते व्यंकटराव पाटील, अजीम दायमी, शंकर मुक्कावार, गजानन सताळकर, रामभाऊ हाडोळे, धनप्पा बनसोडे, अजय शेटकर, कृष्णा घोगरे, मनमत कोनमारे, विकी भोसले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी पुढे मार्गदर्शन करताना विनायकराव पाटील यांनी स्पष्ट केले की, वैचारिक भूमिका बाजूला ठेवून जे लोक भारतीय जनता पक्षासोबत गेले आहेत, त्यांना जनता निश्चितपणे धडा शिकवेल, असे सांगितले. याप्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले. या बैठकीसाठी युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *