आयकाॅन हाॅस्पिटलचे उद्या उद्घाटन
लातूर (प्रतिनिधी) : लातूर येथील आयकॉन सुपरस्पेशालिटी हाॅस्पिटलचे नव्या वास्तूत स्थलांतर झाले असून या प्रकल्पाने लातूरच्या वैभवात भर पडणार आहे. डॉ.प्रमोद घुगे यांचे आयकाॅन रुग्णालय आता रुग्णांसाठी आयडाॅल ठरत आहे.एवढेच नाही तर मराठवाड्यातील रुग्णांची किडनी बदलण्यासाठी वणवण फिरते आता कायमस्वरूपी थांबणार आहे.केवळ अनुभव गाठीशी असावा म्हणून डॉ.घुगे यांनी काही काळ पुणे येथील आदित्य बिर्ला हाॅस्पिटलला स्पेशल किडनी विषयात काम केले.लातूरला येईपर्यंत तब्बल दोन हजार किडनी प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया त्यांनी केल्या होत्या.हे विश्वाची माझे घर,न म्हणता त्यांनी गरजवंत सर्वसामान्य रुग्ण, माझी लोकच माझे विश्व म्हणून लातूरची निवड केली.यापेक्षाही वाखाणण्याजोगी सांगायचे झाले तर, डॉक्टर होईपर्यंत आणि डॉक्टर झाल्यावर सुद्धा मुळात पेहलवान असलेल्या या माणसाचे कुस्ती वरील वा खेळावरील प्रेम तसूभरही कमी झालेले नाही.आयकाॅन हाॅस्पिटलच्या माध्यमातून आरोग्य संबंधित संपूर्ण सुविधा एकाच छताखाली मिळणार असल्याने आणि येणाऱ्या काळात किडनी बदलण्याचे काम आता येथेच होणार असल्याने रुग्णांची सर्वत्र फिरण्याची वणवण तर थांबणारच आहे.शिवाय त्यांचा वेळ ही वाचणार आहे.