मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा म्हणून मौजे दावणगाव येथे रस्ता रोको
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर तालुक्यातील मौजे दावणगाव येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी व मराठा नेता जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या रस्ता रोको मध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. हा रस्ता रोको सकाळी 11 वाजेपासून दुपारी 1 वाजेपर्यंत चालला. ह्या रस्ता रोको मध्ये शिवाजी भोळे, धनाजी मुळे, राजकुमार भंडे, मनोहर भंडे, महेश फुले, कमलाकर फुले, बालाजी हुरुसनाळे, सोपान महापुरे, बालाजी भंडे, ज्ञानोबा भंडे, आशिष हुरुसनाळे, यशवंत ढगे, सुरेश भंडे, रमेश भंडे, कालिदास भंडे, सरदार पठाण, कृष्णा बंडे, अरविंद सूर्यवंशी, शरद बिरादार, प्रभाकर बिरादार, सचिन पताळे, विजयकुमार पताळे, रणजीत भंडे, पांडुरंग हुरुसनाळे, उद्धव हलकरे, महेश भोळे असे अनेक शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. वाहनाच्या मोठ्या प्रमाणावर रांगा लागल्या होत्या. ग्रामीण पोलीस स्टेशनचे पो. नि. अरविंद पवार व पोलीस उपनिरीक्षक चेरले यांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त दिला होता. रस्ता रोको संपल्या नंतर महसूल प्रशासनाचे मंडळ अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.