मानधन नाही मिळाल्यास आमरण उपोषण करणार – रामदास कदम
साक्षर भारत प्रेरक प्रेरिका संघटनेने खासदार, आमदार, मंत्र्यांना निवेदन
देवणी (लक्ष्मण रणदिवे) : आपल्या थकीत मानधनासाठी साक्षर भारत प्रेरक प्रेरिका संघटनेच्या वतीने आपल्या विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले तसेच भावी नियोजनाच्या संदर्भात जिल्हा परिषद लातूर येथील मैदानात बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये अनेक विषयावर चर्चा करण्यात आली तसेच मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर, शिक्षणाधिकारी योजनाच्या सौ. अनिता काळे यांच्या मार्फत शिक्षण संचालक यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले. मागण्या मध्ये प्राधान्याने प्रेरक प्रेरिका यांचे थकित मानधन देणे,नव भारत साक्षरता योजनेत सामावून घेणे, अंशकालीन दर्जा देणे.या मागण्याचा समावेश आहे .आपल्या मागण्या मान्य नाही झाल्यास महाराष्ट्र राज्य साक्षर भारत प्रेरक व प्रेरिका संघाचे, भगवानराव देशमुख, दत्ता देशमुख यांच्या नेतृत्वाखाली संचालक कार्यालय पुणे येथे आमरण उपोषण करण्याचे ठरले आहे. या बैठकीला लातूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष भुंगज अर्जुने,रामदास कदम जळकोट तालुका अध्यक्ष ,लक्ष्मण रणदिवे देवणी तालुका अध्यक्ष ,प्रकाश घोरपडे निलंगा तालुका अध्यक्ष , सलीम बिरादार जळकोट उपाध्यक्ष, दशरथ वाघमारे जळकोट, नागनाथ गायकवाड,सुनील पांढरे,लातूर, धनराज देडे, प्रल्हाद गुबनर, महानंदा तादलापुरे, छाया गायकवाड, शोभा बिरादार, पद्मीन गायकवाड, त्रिशला कांबळे, कावेरी नितंगे, मंदा आदमाने, वैशाली शिंदे, रंजना पोलकर, काशिनाथ मुगे,माधव काबळे, रवि गायकवाड आदीची उपस्थिती होती.