हाळी-हंडरगुळीत पुन्हा वाहतूक सेवा कोलमडली !! पोलिसांनी “कमिटमेंट” पुर्ण करावी
हांडरगुळी (विठ्ठल पाटील) : येथील सर्व वाहणांना शिस्त लावणार आणि जो कुणी बेशिस्तीत वाहन पार्क करेल व वाहन चालवेल त्यांच्यावर नियमाने कायदेशीर दंडात्मक कारवाई करु. असा शब्द सपोनी भिमराव गायकवाड जाने.24 मध्ये पोलिस चौकीत घेतलेल्या शांतता समितीच्या बैठकीत उपस्थितांना दिला होता, तेंव्हा दिलेला शब्द पुर्ण करण्याची मागणी आज जनतेतून होताना दिसते.याचे कारण म्हणजे येथून गेलेल्या राज्य मार्गालगत तसेच मेन मार्केट मध्ये व जि.प.कन्या शाळेपुढून जाणा-या रोडवर होणारी वाहनांची वेडीवाकडी पार्कींग,यामुळे रविवार या बाजार दिनी तर पादचाऱ्यांना जीवमुठीत घेऊनच वरील रोडवरुन ये-जा करावे लागते.तसेच अपघाताची शक्यता ही बळावली असुन, दिलेला शब्द पोलिसांनी पाळावा.अशी मागणी जनतेतून जोर धरत आहे. 2 महिण्यापुर्वी कांही काळापुरती पोलिसांनी दुचाकीवर कारवाईची मोहिम सुरु केली होती.यामुळे वाहन चालकांत भिती पसरली होती. सामान्य व जाणकार जनतेतून या मोहिमेबद्दल सपोनी.गायकवाड,पोउ- निरीक्षक एम.के.गायकवाड,दबंग हे.काॅ.संजय दळवे, कसबे, सारोळे, अक्केमोड, सोनकांबळे यांचे कौतूक झाले.मात्र नंतर ही मोहिम का व कशामुळे थंडावली? हे कळले नाही.