बॅरेजमुळे होणार जलक्रांती; १३८ कोटी रुपयांच्या कामास मंजुरी आ. बाबासाहेब पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपूर – चाकुर तालुक्यातील ८ कोल्हापुरी बंधाऱ्याला बॅरेजस मध्ये रूपांतर करण्याच्या प्रकल्पास मंजुरी मिळाली आहे. यामध्ये अहमदपूर तालुक्यातील येस्तार, मावलगाव १, मावलगाव २, मानखेड, सोनखेड, चिलखा, टाकळगाव – शेणकुड व चाकूर तालुक्यातील टाकळगाव – शेळगाव या कोल्हापुरी बंधाऱ्याचा सामवेश आहे. मागील २० वर्षापासून या बंधाऱ्यामध्ये पाणीसाठा होत नव्हता, जुन ते सप्टेंबर दरम्यान पावसाळा हंगामात पाणी साठवून ठेवण्यासाठी दरवाज्याचे बंद करण्यात यायचे व पाणी क्षमता वाढल्या नंतर सोडण्यात यायचे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसायचे ज्यामुळे त्यांना नुकसानीचा सामना करावा लागायचा. तसेच पाणी साठवण क्षमता देखील कमी व्हायची. पण येणाऱ्या काळात या बॅरेजस मुळे ही समस्या दूर होणार आहे.
या प्रकल्पामुळे एकूण ४०५ हेक्टर शेतजमिनीचे सिंचन होणार असून यासाठी १३८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामध्ये अहमदपूर तालुक्यात ७ तर चाकूर तालुक्यात १ बॅरेज असून आ. बाबासाहेब पाटील यांच्या प्रयत्नातून आणि सातत्याने पाठपुरावा केल्याचे हे फलित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण पाहावयास मिळत असून सर्व शेतकऱ्यांनी आ. बाबासाहेब पाटील यांचे आभार व्यक्त केले आहे.
या प्रकल्पामुळे परिसरातील नव्हे, तर अहमदपूर – चाकूर तालुक्यातील काही भागाचा पिणे व वापरण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमाचा मार्गी लागणार आहे. यामुळे ग्रामीण भागासह शहरी भागाला देखील फायदा होणार आहे. हे महत्वाकांक्षी प्रकल्प सुरु होण्यासाठी आमदार बाबासाहेब पाटील यांनी विशेष प्रयत्न केल्याने प्रकल्पास मंजुरी मिळाली. त्याबद्दल आमदार बाबासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आभार मानले आहेत.
यासोबतच माजी मंत्री बाळासाहेब जाधव साहेब यांचे प्रयत्न व यश आहे .
अधीक्षक अभियंता श्री. चिस्ती इलियास, कार्यकारी अभियंता लातूर महेंद्र काळे, उपअभियंता सुरेश मंडलापुरे, व्यंकट पाटील, सहाय्यक अभियंता सुशांत शिंदे, अमित पवार, कटकमवार यांच्यासह या कामासाठी प्रमुख मार्गदर्शन करणारे अभियंता प्रमोद शिंदे या सर्व अधिकारी व प्रशासनाचे देखील आभार व्यक्त करतो.