भारतीय लोकशाही धोक्याची आहे -निवृत्तसनदी अधिकारी व सिनेअभिनेते अनिल मोरे यांचे प्रतिपादन
अहमदपूर (गोविंद काळे) : लोकशाही निष्ठ, धर्मनिरपेक्ष आणी संविधानाची बुज असणाऱ्या तमाम भारतीयांनो रात्र वैऱ्याची आहे. संविधानाच्या अस्तित्वावरच घाला बसण्याची दाट शक्यता आहे. आज खऱ्या अर्थाने राज्यघटनेची होणारी पायमल्ली, लोकशाही आणी स्वायत्त संस्थेचा ऱ्हास त्यामध्ये सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप याचा परिणाम म्हणून भारतीय लोकशाही धोक्यात आलेली आहे, असे प्रातिपादन नांदेड येथील माजी सनदी अधिकारी तथा मराठी सिनेकलावंत अनिल मोरे यांनी व्यक्त केले.
ते अहमदपूर येथील मराठा सेवा संघ पुरस्कृत जिजाऊ सावित्री बचत गट व मराठा क्रांती महिला बचत गट यांनी शिवजयंतीनिमित आयोजित केलेल्या ‘ शिवमेळा ‘ या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार विजेते निवृत्त प्रा. दत्ता भाऊ गलाले तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते तथा मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. गोविंद शेळके आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना मोरे म्हणाले की, जय श्रीरामा च्या घोषणा देवून स्त्रीयांच्या अब्रूची विटंबना करणारे मणिपूर बलात्कार व हत्याकांड प्रकरण, बिलकिस बानू बलत्कार व कुटूंबीयांची हत्या प्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता व माणुसकीला काळीमा फासणारा लाजीरवाणा सत्कार, शेतकऱ्यांचे बलिदान, सीबीआय व ईडीची भिती घालून विरोधी पक्ष फोडणे व विरोधी पक्षातील भ्रष्टाचारी राज्यकर्त्यांना स्वपक्षात घेऊन सत्तेच्या वाशिंग मशीनमध्ये घालून स्वच्छ करणे, यामुळे लोकशाही धोक्यात आली असल्याचे सांगीतले.
यावेळी माजी मंत्री बाळासाहेब जाधव, मोहीब कादरी, सत्यनारायण काळे, द. मा.माने, नारायण कांबळे यांच्यासह महिला भगिनीची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गणपत जाधव,प्रास्ताविक आशोकराव चापटे तर आभार समर्थ लोहकरे यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष प्रा.नाना कदम,दत्ता कदम, शिवशंकर लांडगे, सिध्दार्थ दापके, वडवळे सर आदींनी श्रम घेतले.