लालबहादुर शास्त्री प्राथमिक शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिवस मोठ्या उत्साहात साजरा
उदगीर (एल.पी.उगीले) : भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई द्वारा संचलित लालबहादुर शास्त्री प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना विज्ञानाचे महत्त्व व फायदे समजावेत म्हणून डॉ.चंद्रशेखर वेंकटरामन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून सुधाकर पोलावार,मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे व प्रमुख मार्गदर्शक म्हणून माधव केंद्रे उपस्थित होते.मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.गुलाबपुष्प देऊन शाळेच्या वतीने मान्यवर पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीमधून एकूण ८३ विद्यार्थ्यांनी खूप छान प्रकारे विविध प्रयोगांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक माधव केंद्रे यांनी आजच्या दिवशी डॉ सि.व्ही.रामण यांनी रामण इफेक्ट्सचा शोध लागल्याची घोषणा केली होती.विविध भारतीय शास्त्रज्ञ व त्यांनी लावलेल्या शोधाबद्दल माहिती सांगितली.विज्ञानामुळे आपणास खूप फायदे झालेले आहेत.आजही नवनवीन शोध लागत आहेत.असे सविस्तर मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय समारोपपर भाषणात सुधाकर पोलावार यांनी आज विद्यार्थ्यांनी खूप छान प्रकारे प्रयोग सादर केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.विद्यार्थ्यांनी डॉ.सि.व्ही.रामण यांच्याविषयी माहिती मिळवून वाचन करावी.सर्वांनी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगावा.असे सांगितले.सर्वांना राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. सुत्रसंचलन सौ.दिपाली भावसार यांनी केले.