श्यामलाल हायस्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील श्यामलाल मेमोरियल हायस्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्यामलाल मेमोरियल हायस्कूल चे मुख्याध्यापक बालाजी चव्हाण यांनी अध्यक्षस्थान भूषवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. प्रमुख अतिथी व वक्ते म्हणून प्रा. खंदारे भारत हे होते. याप्रसंगी व्यासपीठावर पर्यवेक्षक राहूल लिमये, जेष्ठ शिक्षिका धनश्री जाधव, विज्ञान विभाग प्रमुख अविनाश घोळवे, इयत्ता पाचवी ते दहावी वर्गाला विज्ञान विषय शिकवणारे सर्व शिक्षक, शिक्षिका आणि सी. व्ही. रमण, डॉक्टर होमी भाभा, डॉक्टर जगदीश चंद्र बोस, थोर शास्त्रज्ञ भारतरत्न ए.पी. जे. अब्दुल कलाम, मेरी क्युरी, अंतराळवीर राकेश शर्मा, कल्पना चावला इत्यादी शास्त्रज्ञांच्या वेशभूषेत विद्यार्थी उपस्थित होते.
राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थी बिरादार साईविश्व, अर्पिता केंद्रे, देवणे श्रुती यांनी प्रभावीरीत्या विज्ञानाचे महत्त्व मानवी जीवनामध्ये अनन्यसाधारण आहे, याबद्दल मनोगत व्यक्त केले, पर्यावरण जाणीव जागृती विषयक पथनाट्य दहिफळे रागिनी, बिरादार जानवी, सगर श्रुती, कमलापुरे ख़ुशी,मजगे साधना, माने सोहम, पावडे ऋतुराज, कुलकर्णी प्रज्वल इत्यादी विद्यार्थ्यांनी प्रभावीरीत्या सादर करून वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन महत्त्व समजावून दिले.
प्रमुख वक्ते प्राध्यापक खंदारे भारत यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनाबद्दल सर्वांना शुभेच्छा दिल्या व विज्ञानाचे महत्त्व प्रत्येक सजीवाच्या जीवनाच्या सुरुवातीपासून मृत्यूपर्यंत कसे आहे, ते सांगितले. विज्ञानाच्या आधारे आज जग प्रगतीपथावर आहे, विज्ञानाच्या आधारे अनेक नवनवीन शोध लावून मानवाचे जीवन सुकर व प्रगतिशील झाले आहे. त्यामुळे विद्यार्थी दशेपासूनच सर्वांनी विज्ञानावर निष्ठा ठेवून आपली प्रगती साधावी, विज्ञानाचा उपयोग आपल्या देशाच्या, समाजाच्या विकासासाठी करावा, वैज्ञानिक शोधाचा कोणीही दुरुपयोग करू नये यासंबंधी मत व्यक्त केले.
राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून शाळेमध्ये विज्ञान प्रयोग प्रदर्शनाचे भव्य दिव्य असे आयोजन करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साह पूर्ण सहभाग घेतला, विद्यार्थ्यांनी स्वतः केलेले प्रयोग, प्रात्यक्षिक यांचे प्रदर्शन शाळेत भरवण्यात आले. ते प्रदर्शन शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले. चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी प्रयोग प्रदर्शन केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष ऍड सुपोषपाणि आर्य तसेच संस्था सहसचिव श्रीमती अंजुमनीताई आर्य, शाळेचे मुख्याध्यापक बालाजी चव्हाण, पर्यवेक्षक राहुल लिमये यांनी प्रयोग प्रदर्शनात सहभाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या मार्गदर्शकांचे अभिनंदन केले. व राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम, विज्ञान प्रयोग प्रदर्शन या कार्यासाठी शाळेतील विज्ञान विषय शिक्षक अविनाश घोळवे, उमाकांत सूर्यवंशी, आसमा उंटवाले, जेठुरे शीतल, चंदे अंजली यांनी कार्यक्रमाच्या व प्रयोग प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य, प्रयत्न व मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रभावीरीत्या सूत्रसंचालन जाधव मानसी या विद्यार्थिनीने केले तर आभार व्यक्त करण्याचे कार्य उमाकांत सूर्यवंशी यांनी केले.