हायटेक इंग्लिश स्कूल येथे विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन व पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

0
हायटेक इंग्लिश स्कूल येथे विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन व पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

हायटेक इंग्लिश स्कूल येथे विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन व पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील हायटेक इंग्लिश स्कूल येथे राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने मोठ्या उत्साहात विविध शास्त्रज्ञांच्या शोधाच्या संदर्भात माहिती देऊन शास्त्रज्ञ सी व्ही रमण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विज्ञान प्रदर्शन आणि पारितोषिक वितरण समारंभाला सुरुवात झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य फरजाना मेहबूब मंगरूळे या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे गणित विभाग प्रमुख डॉ. बी.डी. करंडे व दुग्धशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एस एन लांडगे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन रामन इफेक्ट या विषयावर बनवलेल्या भितीपत्रकाचे अनावरण करून संपन्न झाले. याप्रसंगी उदगीर शहरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनी मध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता. यामध्ये झी माउंट लिटेरा या शाळेचा प्रयोग प्रथम आला तर द्वितीय क्रमांक हायटेक इंग्लिश स्कूल येथील विद्यार्थ्यांचा व तृतीय क्रमांक ब्राईट स्टार इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पटकावला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ. करांडे बि.डी. यांनी भारतीय शास्त्रज्ञ सी व्ही रमण यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला, तसेच वैज्ञानिक जाणीव विकसित करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे सांगितले. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि जिज्ञासू वृत्ती निर्माण होणे गरजेचे असल्याचे सांगितले. त्यावेळी शाळेतील शिक्षक जागीरदार एन एम, बिरादार एस एस, महाजन आर एन, भोसले व्ही बी, सौ नासेरा शेख, खतीब आसरा, जहिरा पटेल, शेख खाजागी, अनुराधा घोरवाडे, श्रीदेवी पाटील इत्यादी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील सहशिक्षक आर एम महाजन यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ शेख नासेरा यांनी केले. हायटेक इंग्लिश मीडियम स्कूलच्या माध्यमातून समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम हाती घेतल्याबद्दल तालुक्यातील सर्व शिक्षणप्रेमीच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!