किलबिल शाळेत स्पोर्ट्स मिट उत्साहात संपन्न
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील किलबिल नॅशनल स्कूल येथे दिनांक 1 व 2 मार्च रोजी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत शरीर ही तेवढेच आवश्यक आहे तसेच विद्यार्थ्यांमधील क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदरील स्पर्धेचे उद्घाटन शाळेची विद्यार्थिनी तथा खेलो इंडिया स्पर्धेचे नेतृत्व केलेली कुमारी माही आरदवाड हिच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आले. या स्पर्धेत 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर रनिंग, सॅक रेस,कब्बडी, झिग झेग रेस, रोप जम्प, आदी स्पर्धेत एकूण 1 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या दोन दिवस सुरू असलेल्या विविध स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा आज संस्थेचे सचिव ज्ञानोबा भोसले यांच्या अध्यक्षतेखाली तर जीवनगौरव पुरस्कार प्राप्त आदरणीय गणपतराव माने, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त दत्ताभाऊ गलाले, धर्मपाल गायकवाड, पोलीस अधिकारी असद शेख, अहिल्यादेवी होळकर शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत माने, प्राचार्य संतोष पाटील, पर्यवेक्षक महावीर गोडभरले यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे प्राचार्य संतोष पाटील यांनी केले सूत्रसंचालन सचिन जगताप यांनी तर आभार क्रीडा शिक्षक इरफान अकोले यांनी मानले. कार्यक्रमासाठी क्रीडा शिक्षक विशाल सरवदे, अर्शद शेख, कासिम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व शिक्षकांनी मेहनत घेऊन सदरील स्पर्धा पार पाडली.