भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या मराठवाडा अध्यक्ष पदी ज्ञानोबा चाटे यांची निवड
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते ज्ञानोबा चाटे यांचे सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य पाहुन रविंद्र देविदी मुंबई प्रणित भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या मराठवाडा अध्यक्ष पदी नुकतीच कामिनी निवास पांडूरंगवाडी मिरा ठाणे येथील कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत बिनविरोध निवड करण्यात आली असुन भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र देविदी यांच्या हस्ते चाटे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. माझ्या निवडीचे संपूर्ण श्रेय मी समितीचे विदर्भाचे अध्यक्ष एम.बी फड यांना देतो त्यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाड्यात भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे काम अधिक जोमात करणार असुन त्यांच्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही अशी प्रतिक्रिया आमच्या प्रतिनिधिशी बोलताना चाटे यांनी दिली.
या निवडीबद्दल भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे महाराष्ट्र अध्यक्ष मधुकर पतंगे, दक्षिण महाराष्ट्र अध्यक्ष बालासाहेब इतापे, महाराष्ट्र दक्षता अधिकारी संजय तिखे पाटील, महाराष्ट्र सचिव तुळशीराम लुंगारे, महाराष्ट्र महामंत्री प्रदिप फाले, महाराष्ट्र एरिया ऑफीसर प्रकाश रोकडे, महाराष्ट्र जनसंपर्क अधिकारी आनंद वरवटे, लातुर जिल्हाध्यक्ष बालाजी चावरे, शिरूर अनंतपाळ तालुका अध्यक्ष श्वेत मोगरगे रेणापुर तालुका अध्यक्ष राहुल गुणाले, अहमदपूर तालुका पि.आर.ओ पद्माकर मोरे, सामाजिक कार्यकर्ते इतिराज केंद्रे,आदर्श पुरस्कार प्राप्त प्राध्यापक गोविंद भगत, राहुल गुणाले, प्रकाश रोकडे, संजय बोबडे,संजय सातपुते, मन्मथ प्रयाग, शेख जहाँगीर , गोविंद बडे, गंगाधर हेंगणे, संदिप मुरकुटे, राजु पाटील, कैलास झुंनझुंनवार, गजानन पारसेवार, अमोल मोरे, नरसिंग चावरे, गजानन हाडोळे, आदींनी अभिनंदन केले आहे.