वंचित व उपेक्षित गटातील लोकांना विविध प्रमाणपत्राचे वाटप
उदगीर (एल.पी.उगीले) : तालुक्यातील मौजे तोंडार पाटी, वंजारवाडी याठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय लातूर अंतर्गत तहसील कार्यालय उदगीर यांचे वतीने आयोजीत भटक्या विमुक्त जाती व जमाती मधील वंचित लाभार्थ्यांना विविध प्रकारचे दाखले वाटप करण्यात आले. व मतदार नोंदणी कार्यक्रमाचे मार्गदर्शन लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे,सुशांत शिंदे उपविभागीय अधिकारी उदगीर यांचे सूचनेनुसार राम बोरगावकर तहसीलदार उदगीर यांच्या शुभहस्ते विविध प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. भटक्या जाती जमातीतील लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. व त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तशा सूचना प्रशासनातील अधिकारी व स्थानीक पातळीवरील कर्मचारी यांना देण्यात येऊन भटक्या विमुक्त जाती जमातीतील लोकांच्या वंचित असलेल्या या प्रश्नाकडे लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या.या कार्यक्रमास नायब तहसीलदार एस.पी.बेंबळगे,मंडळ अधिकारी कैलास उडते ,मंडळातील सर्व तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तोंडार येथील मतदार यादीप्रमाणे सर्व बीएलओ, आशा ताई, अंगणवाडी सेविका, तोंडार येथील माधव पाटील,शिवलिंग नावंदे,आनंदराव मालोदे,मसना सुरनर, निळकंठ बिरादार, महा-ई-सेवा केंद्राचे राहुल रक्षाळे,संग्राम बिरादार,पुंडलिक जाधव,भटक्या विमुक्त जाती जमातीच्या विविध संघटनेचे पदाधिकारी व महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थीत होते.गणपत वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले तर तोंडार गावचे सरपंच भरत कोचेवाड यांनी कार्यक्रमाचे आयोजन व आभार यावेळी मांडले.