व्यवसाय व्यवस्थापन पदव्युत्तर पदवीधारकांसाठी उपलब्ध संधीच्या संदर्भात मार्गदर्शन संपन्न

0
व्यवसाय व्यवस्थापन पदव्युत्तर पदवीधारकांसाठी उपलब्ध संधीच्या संदर्भात मार्गदर्शन संपन्न

व्यवसाय व्यवस्थापन पदव्युत्तर पदवीधारकांसाठी उपलब्ध संधीच्या संदर्भात मार्गदर्शन संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) : वसंतराव नाईक मराठवाङा कृषि विद्यापीठाशी ( परभणी ) संलग्नित कृषि महाविद्याल ङोंगरशेळकी तांङा, उदगीर येथे बी.एस्सी. कृषि पदवीच्या अंतिम सत्रातील “अनुभवाधारित कौशल्य विकास” अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी,ङी.बी. व्यवस्थापन व संशोधन संस्था,लातूर आणि कृषि महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने
“व्यवसाय व्यवस्थापन पदव्युत्तर (एमबीए ) शिक्षण , नोकरी – रोजगार व खाजगी उद्योग क्षेत्रांतील उपलब्ध संधी ” , यावर प्रा. शिवाजीराव एडके यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजीत करण्यात आले होते. प्रारंभी ,कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य व कार्यक्रमाचे अध्यक्ष ङॉ. अंगदराव सुर्यवंशी,उपप्राचार्य डॉ. अशोकराव पाटील, तज्ञ मार्गदर्शक प्रा. शिवाजी एङके,सहाय्यक प्राध्यापक, ङी.बी. व्यवस्थापन व संशोधन संस्था, लातूर यांच्या स्वागतानंतर, कार्यक्रमाचे प्रास्ताविक ङॉ. शिवशंकर वानोळे यांनी केले .

तज्ञ मार्गदर्शक प्रा. शिवाजी एङके यांनी संबोधित केले की , कृषि पदवीधर विद्यार्थ्यांनी बाजारमूल्य व उद्योगिक कैशल्यावर आधारीत व्यवसाय व्यवस्थापन पदव्युत्तर शिक्षण प्राप्त करावे . विद्यार्थ्यांनी त्यांच्यातील न्यूनगंडावर मात करून , वेळेचे सुयोग्य नियोजन व ध्येयनिश्चिती करून, आत्मविश्वास बाळगून,संभाषण व लेखन कौशल्य आत्मसात करून, नेतृत्व विकास वृद्धिंगत करावा. त्याचबरोबर स्वयंमूल्यांकन करून स्वतःची बलस्थाने व उणिवा शोधून , संभाव्य धोक्यांवर समर्थपणे मात करावी. व्यवसाय व्यवस्थापन (एमबीए) पदव्युत्तर शिक्षण प्राप्तीनंतर,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध कृषी व संलग्न क्षेत्रांमध्ये नोकरी, रोजगार , व्यवसाय आणि कृषि व कृषिपूरक खाजगी, सार्वजनिक क्षेत्रांमध्ये अमाप संधी उपलब्ध असल्याचे नमूद केले.
अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्य ङॉ. अंगदराव सुर्यवंशी यांनी कृषी पदवीधरांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध अमाप संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले. त्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वयंशिस्त, मेहनत , जिद्द व चिकाटी बाळगून , ध्येयप्राप्ती करावी असा मौलिक सल्ला उपस्थित विद्यार्थी, विद्यार्थिनींना दिला .
विद्यार्थी समुपदेशन आणि रोजगार कक्षाचे अध्यक्ष प्रा. ङॉ. शिवशंकर वानोळे , सचिव प्रा. ङॉ. दीपक पानपट्टे , प्रा. सचिन खंङागळे , प्रा. शितल पाटील , प्रा . डॉ. दिपाली कोकाटे, प्रा. स्नेहा मुन,प्रा. डॉ. सागर खटके, प्रा. ङॉ. वसीम शेख ,प्रा. सुरेश नवले,प्रा. ङॉ. करण जाधव इत्यादींनी सदरील मार्गदर्शन व समुपदेशन कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन केले. या कार्यक्रमासाठी, महाविद्यालयातील प्राध्यापक , कर्मचारी , विद्यार्थी- विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शितल पाटील यांनी केले आणि ङाॅ. सागर खटके यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *