वाढवणा येथे “पंचगव्या” सेंद्रिय द्रावणाचे शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर प्रयोग

0
वाढवणा येथे "पंचगव्या" सेंद्रिय द्रावणाचे शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर प्रयोग

वाढवणा येथे "पंचगव्या" सेंद्रिय द्रावणाचे शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर प्रयोग

उदगीर (एल.पी.उगीले) : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी महाविद्यालय, डोंगरशेळकी तांडा, उदगीर येथील पदवीच्या विद्यार्थ्यांनी अनुभवावर आधारित कार्यक्रमांतर्गत सेंद्रिय खतांचे व्यावसायिक उत्पादन आणि विपणन या उपक्रमाद्वारे गांडूळखत निर्मिती, दशपर्णी अर्क, पंचगव्या यासारखे सेंद्रिय उत्पादनाची निर्मिती यशस्वी रित्या पूर्ण केली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून परिसरातील शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय उत्पादनाचे महत्व याविषयी जनजागृती करण्यात आली, व त्याचाच एक भाग म्हणून मौजे वाढवणा येथे पंचगव्या या सेंद्रिय व शाश्वत द्रावणाचे, प्रगतशील शेतकरी विष्णु केसकर यांच्या टोमॅटो प्रक्षेत्रावर फवारणी केली, व याचे महत्व विद्यार्थ्यांद्वारे सांगण्यात आले. पंचगव्या हे एक सेंद्रिय द्रावण असून ते पिकाच्या वाढीसाठी अत्यन्त उपयुक्त आहे. गायीच गोमूत्र, शेण, दही, दूध, तूप या पाच घटकांपासून पंचगव्या बनवले जाते.
अनुभवावर आधारित कार्यक्रमांतर्गत चलणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. पी. सूर्यवंशी, उप-प्राचार्य डॉ. ए. एम. पाटील, डीडीओ डॉ. आनंद दापकेकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. हे प्रात्यक्षिक यशस्वीरित्या पूर्ण होण्यासाठी कृषिविद्या विभागप्रमुख डॉ. शेख वसीम, कार्यक्रम प्रभारी प्रा. सुरेश नवले यांनी परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *