राशनच्या धान्याचा अपहार मनसेचे स्टिंग ऑपरेशन

0
राशनच्या धान्याचा अपहार मनसेचे स्टिंग ऑपरेशन

राशनच्या धान्याचा अपहार मनसेचे स्टिंग ऑपरेशन

जळकोट (एल.पी.उगीले) : मनसेच्या वतीने संतोषभाऊ नागरगोजे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना 22 जाने 24 रोजी निवेदन देवुन हा स्वस्त धान्याचा होणारा अपहार व वाहतुक कंत्राटदार यांच्या मनमानी कारभारवर कार्यवाही करण्यासंदर्भात मागणी केली होती. व गेल्या दिड महिन्यात जिल्हाधिकारी,जिल्हा पुरवठा अधिकारी, सर्व तहसीलदार याना वेळोवेळी निवेदने देवुन पाठपुरावा करून स्वस्त धान्य काळाबाजार थांबत नसल्याने, मनसे कार्यकर्त्यांनी व पत्रकारांनी दिनांक 06-03-2024 रोजी जळकोट तहसील कार्यालयाच्या स्वस्त धान्य दुकानाच्या गोडाऊन मधून घोणसी स्वस्त धान्य दुकानावर जाणाऱ्या वाहनास (क्रमांक एम एच 24 जे 9666) थांबउन मनसे कार्यकर्त्यांनी वाहनाची तपासणी केली असता वाहनातील धान्याच्या कट्ट्यामध्ये दोन ते तीन किलो धान्य कमी आढळून आले. त्यावरून गोदामपाल व अतिरिक्त नायब तहसिलदार पुरवठा हिप्परगे जी.एस. यांच्या समक्ष विचारणा केली असता त्यांनी स्वतः त्या वाहनाची तपासणी केली. ज्यामध्ये एकूण 22 कट्ट्याचे वजन करण्यात आले, दोन ते तीन किलो वजन कमी दिसून आले आहे. त्या संदर्भाने गोदाम रक्षक हिप्परगे यांनी सदरील वाहनाचा पंचा समक्ष पंचनामा केला. त्यात वजन केलेल्या कट्ट्याचे 49, 47 ,48 किलो अशा प्रकारचे सर्व कट्ट्याचे वजन आढळून आले. ज्याचे वजन नियमानुसार 50 किलो 500 ग्राम असायला पाहिजे, तसेच वाहतूक कंत्राटदाराला ठेका देत असताना महाराष्ट्र शासनाने जे नियम घालून दिलेले आहेत, त्या कोणत्याही नियमाचे पालन वाहतूक कंत्राटदारा कडून होताना दिसून आले नाही. त्यामध्ये वाहनांमध्ये वजन काटा असणे, वाहनास हिरवा रंग नसणे, वाहन चालक मदतनीस हमाल यांचे विमा उतरवलेले नसणे अशा कुठल्याही नियमाचे पालन वाहतूक कंत्राटदारा कडुन होताना दिसून आले नाही. सदरील सर्व बाबींचा पडताळा करून पंचा समक्ष पंचनामा करण्यात आला. सदरील राशनच्या धान्याचा अपहार करून जीवनावश्यक वस्तू कायद्याची पायमल्ली करण्यात आली आहे. हे स्टिंग ऑपरेशन करताना जिल्हाध्यक्ष संजय राठोड, तालुकाध्यक्ष महेश देशमुख, उदगीर शहराध्यक्ष संतोष भोपळे,गजानन पद्दमपल्ले, ऋषिकेश भोंगळ, रणजित मालुसरे, चंद्रकांत कुणके, मनोज भिसाडे, विकास काळे,मारोती धोंडापुरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *