द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौटंट्स ऑफ इंडिया लातूर शाखेच्या वतीने नारीशक्तीचा सन्मान
लातूर (प्रतिनिधी) : शहरातील भालचंद्र ब्लड बँक येथे द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौटंट्स ऑफ इंडिया लातूर शाखेच्या वतीने मंगळवारी विविध क्षेत्रात उत्कृष्ट व नाविन्यपूर्ण काम करणार्या सर्व महिलांचा एुलशश्रश्रशपलशऽ ३६० जागतिक महिला दिनानिमित्त नारी शक्तीचा सन्मान करण्यात आला. तर कार्यक्रमाच्या प्रारंभी सरस्वती मातेच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. तर यावेळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौटंट्सऑफ इंडिया लातूर शाखेच्या वतीने हा सत्कार आयोजित केल्याबद्दल सर्व टीमचे त्यांनी मनापासून आभार व्यक्त केले. तर यावेळी जिल्हाधिकारी वर्ष ठाकूर-घुगे यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सीएचे खूप मोठे योगदान आहे, व तसेच सामाजिक ,राजकीय,अव्यवस्थेत व तसेच विविध क्षेत्रात महिलांचे योगदान असल्याचे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी केले.
सीए विद्यावती वंगे यांनी वेअल्थ क्रीएशन या विषयावर माहिती दिली.तसेच यावेळी विविध विषयावर मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले.तर या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर-घुगे, कस्तूरी सनाप, (बी.टेक, एम.बी.ए. आणि सी.एफ.ए, सध्याचा उत्कृष्ट ीशपळेी मॅनेजर शुश्र सर्व्हिसेसमध्ये), डॉ. ममता वोरा (स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर.), प्रा. डॉ. अन्जली बुरांडे-कोरे, एडवोकेट स्मिता परचुरे , मुख्याधिपिका जयश्री ठवळे, इन्स्पेक्टर वर्षा दण्डीमे-बरूरे, सीए राजश्री भुतडा, प्रीतम जाधव, (एक सफल व्यवसायिका), पल्लवी तोडकर (गृहिणी व सी ए रविकिरण तोडकर यांची पत्नी) अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणार्या सर्व महिलांचा यथोचित सत्कार करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी अध्यक्ष सीए राहुल धरणे , उपाध्यक्ष सीए महेश तोष्णीवाल, सचिव सीए निलेश बजाज, कोषाध्यक्ष एकनाथ धर्माधिकारी, विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष सीए द्वारकादास भुतडा, सदस्य सीए विश्वास जाधव व शाखा प्रभारी सुमित ठाकूर, समन्वयक सीए विद्यावती वंगे , सीए नेहा काबरा, सीए पायल नावंदर, सी ए इशिता व्यास, स्मिता नवटक्के, स्वाती धरणे आणि पुजा तोष्णीवाल यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. तर याच कार्यक्रमात द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया लातूर शाखेची नवीन महिला समिती स्थापित करण्यात आली . तर यामध्ये मेंबर्स सीए राजश्री भुतडा, सीए विद्यावती वंगे , सीए नेहा काबरा, सीए पायल नावंदर, सी ए इशिता व्यास, सी ए वनश्री परदेसी, सी ए वैष्णवी हलकुडे आधी महिलांची यावेळेस निवड करण्यात आली आहे.