पश्चिम बंगाल येथील संदेशखली भागातील महिलावर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात अभाविपची निदर्शने
लातूर (एल.पी.उगीले) : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद लातूर महानगराच्या वतीने पश्चिम बंगाल येथील संदेशखली भागातील महिलावर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात लातूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे निदर्शने करून निषेध व्यक्त करणार आला.
10 फेब्रुवारी 2024 रोजी पश्चिम बंगालचे राज्यपाल आनंद बोस यांच्या संदेशखली भेटीमुळे या भीषण शोषणाचे सत्य व्यापक स्वरूपात जनतेसमोर आले. पश्चिम बंगालमध्ये, सत्ताधारी पक्षाचे नेते हिंदू घरातील अल्पवयीन मुली आणि महिलांना जबरदस्तीने,भीतीपोटी त्यांचे अपहरण करतात आणि त्यांना तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात आणतात, आणि अत्याचार करतात. असे अनेक घृणास्पद प्रकरणे उघडकीस आली आहेत.बहुतांश पीडित महिला अत्यंत मागासलेल्या आणि अनुसूचित जातीतील आहेत. आणि त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून अनेक कुटुंबांना संदेशखलीतून पळून जावे लागले आहे. पश्चिम बंगाल राज्याच्या महिला मुख्यमंत्र्यांच्या आश्रयाने वर्षानुवर्षे होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक शोषणाला कंटाळलेल्या संदेशखळी येथील हजारो महिला आज राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आश्रयाने राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून संदेशखलीतील महिलांचे शोषण होत असताना आणि योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात राज्य पोलीस अपयशी ठरले आहेत; त्यामुळे या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी अभाविप संपूर्ण देशभर निदर्शने करून जिल्हाधिकऱ्यांमार्फत राष्ट्रपतीना निवेदन देण्यात येत आहे. राज्य सरकारचा सहभाग लक्षात घेऊन संपूर्ण संदेशखळी घटनेची उच्चस्तरीय चौकशी केंद्रीय यंत्रणांकडून करण्यात यावी, आणि तात्काळ कारवाई करण्यात यावी, संदेशखलीतील महिलांवरील अत्याचार आणि त्यांच्या सामूहिक अस्मितेचे उल्लंघन याला तत्काळ आळा घालण्यात यावा, महिलांवरील हिंसाचार आणि अत्याचाराच्या घटनांचे वास्तव सरकार, प्रशासन आणि न्यायिक संस्थांपर्यंत निर्भयपणे पोहोचवण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून द्यावा, न्यायाचा सोयीसाठी, पीडित महिलांना मोफत कायदेशीर मदत दिली जावी, या महिलांना मानसोपचार तज्ज्ञांद्वारे समुपदेशन सत्राची सुविधा देखील प्रदान केली जावी. जेणेकरुन अनेक वर्षांच्या मानसिक अत्याचारातून हळूहळू बरे वाटेल. अशी मागणी यावेळी करण्यात आले.
यावेळी महानगरमंत्री सुशांत एकोर्गे यांनी असे म्हणाले की “गेल्या अनेक वर्षांपासून पश्चिम बंगालमधील उत्तर चोवीस परगणा जिल्ह्यातील संदेशखली भागातील महिलांचे लैंगिक शोषण केले जात आहे, त्यांच्या सामूहिक अस्मितेचे उल्लंघन केले जात आहे, आणि त्यांच्या कुटुंबीयांवर राज्याचे संरक्षण असलेल्या गुन्हेगारांकडून पद्धतशीरपणे अत्याचार केले जात आहेत, ममता सरकार या गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा काम करत आहे.सरकार माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या संवेदनशिल घटनेने अभाविप दुखावले असून त्याचा तीव्र निषेध करते. अशी भावना यावेळी बोलताना व्यक्त केली.
यावेळी वैष्णवी शिंदे ,तेजुमई राऊत, अनुजा चामे ,प्रणव कोळी,अजय ठाकूर, केदार मोरगे, सुजित भोसले, पार्थ पिनाटे,नरेंदप्रतापसिंह ठाकूर, अवि गजभारे, योगेश कोलबुदे,बालाजी हट्ट,प्राप्ती बाबर,दिपाली कोडबले व ईतर कार्यकर्ते उपस्थित होते.