डॉ. राधाकृष्णन प्राथमिक विद्यालयात आजी व माजी विद्यार्थ्यांचा सत्कार
डॉ. राधाकृष्णन प्राथमिक विद्यालयात आजी व माजी विद्यार्थ्यांचा सत्कार
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील डॉ.राधाकृष्णन प्राथमिक विद्यालयात गुणवंत आजी व माजी विद्यार्थी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेतील माजी विद्यार्थी अभय भरत नादरगे यांनी एम.बी.बी.एस.पदवी पूर्ण केल्या मुळे त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सावली धम्मदीप सोमवंशी व विराट काशिनाथ बारुळे या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक विश्वनाथराव मुडपे गुरुजी, निडेबन ग्रामपंचायतचे माजी सरपंच सुनील सोमवंशी, केंद्रप्रमुख बालाजी धुमनसुरे,दशरथराव शिंदे, पुष्पाताई शिंदे, विश्वनाथराव बिरादार माळेवाडीकर, रमाकांतराव बनशेळकीकर, सूर्यकांतराव पांचाळ, नवनाथराव पाटील, भरतराव नादरगे, जोत्सनाताई नादरगे, संस्था सचिव देविदासराव नादरगे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
