जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वयंशासन दिन मोठ्या उत्साहाने संपन्न
देवणी (लक्ष्मण रणदिवे) : देवणी खुर्द येथे सातवीची विद्यार्थ्यांनी पहिली ते सहावीपर्यंत शिकवण्याचे काम शिक्षक, मुख्याध्यापक या प्रमाणे शिकण्याचा काम केले आहे. शाळेचा वेळ संपल्यानंतर निरोप प्रसंगी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शाळेचे माजी शालेय समितीचे अध्यक्ष यादुल पठाण यांनी जिल्हा परिषद शाळेची पट संख्खा कमी होत चालली आहे, तरी चांगले शिक्षक या शाळेतुन बदलून जाणार आहेत, तरी आपल्या गावातील मुलानी देवणीच्या शाळेत न जाता आपल्या शाळेतच प्रवेश घ्यावा, अशी विनंती केली आहे. गुरुवारी शाळेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवणी खुर्द येथे स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक म्हणून शोयब पठाण व उपमुख्याध्यापक म्हणून सुमित रणदिवे यांनी काम पाहिले. तसेच सहशिक्षिका म्हणून जिजाऊ गरड, पुनम नरहरे, मनोज रणदिवे या विद्यार्थ्याने काम पाहिले. यावेळी गोंडगाव केंद्राचे केंद्रप्रमुख केशव नरवटे,शाळेचे मुख्याध्यापक कांबळे, सहशिक्षक एस पी बिरादार ,भरत पुंड ,तेजेवाड, शाळा व्यवस्थापक माजी अध्यक्ष यादुल पठाण, गावातील पालक, युवक, सदस्य, हे उपस्थित होते.