देवणी येथे साई प्रतिष्ठानच्या वतीने समाज भूषण पुरस्कार वितरण संपन्न
देवणी (लक्ष्मण रणदिवे) : प्रति वर्षीप्रमाणे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या देवणी येथील साई प्रतिष्ठाणच्या वतीने विविध क्षेत्रातील उत्तम कार्याबद्दल व सामाजिक कार्याचा सन्मान करण्यासाठी देवणी गौरव समाज भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. शहरांच्या मध्यभागी असलेल्या माणिकराव पाटील यांच्या मैदानावर सुप्रसिद्ध समाज प्रबोधनकार प्रा डॉ वसंत हंकारे यांचे अभ्यासपूर्ण धडाकेबाज व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी शिफा पुणेकर व प्राजक्ता पुणेकर यांचा तुझ्यात जीव रंगला अश्या बहारदार लावणीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. तसेच यावेळी देवणी तालुक्यातील विविध क्षेत्रात उत्कृट कार्य करणारे श्रीमती सारिका काळे (अर्जुन पुरस्कार प्राप्त), प्रशांत इरकर (कामगार आयुक्त), डॉ विनायकराव पाटील विजयनगरकर ,सौ कुशावर्ता बेळ्ळेताई (समाज सेविका), सोमनाथ बिबीनवरे (ग्रामसेवक), ओमकार मसगल्ले महादेववाडी(कृषी भूषण सेंद्रिय शेती राज्य पुरस्कार प्राप्त), गोपाळ बिरादार (तलाठी सज्जा लासोना ), अतिष बनसोडे (तलाठी सज्जा जवळगा), विनायक कांबळे (देवणी पोलीस ठाणे) आशा कर्तबगार व्यक्तीना देवणी समाजभूषण पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. तसेच या व्याख्यान व लावणी कार्यक्रमात देवणी कला क्रीडा महोत्सवाचे संस्थापकध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी , रमेश कोतवाल, फकीर बुद्रे, रेवन मळभागे,डॉ संजय घोरपडे, सतीश बिरादार, दत्ता पाटील तळेगांवकर, संयोजक बबन कांबळे, निमंत्रक डॉ सौ कीर्तीताई घोरपडे, नगराध्यक्षा नगर पंचायत देवणी, उपनगराध्यक्ष अमित मानकरी, सभापती प्रवीण बेळे, रोहित बंडगर, देवणी शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.