नागतिर्थवाडी येथे महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान
उदगीर (एल.पी.उगीले) : जागतिक महिला दिनानिमित्त नागतिर्थवाडी तालुका देवणी जिल्हा लातूर येथे ग्राम पंचायत कार्यालय मार्फत महिलांसाठी असणाऱ्या विविध शासकीय योजनाची माहिती, महीला जीवन विमा, गृहउद्योग, अन्नप्रक्रिया उद्योग, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, बचतगट अनुदान, बचतगट कर्ज योजना, बाल विवाह मुक्त अभियान, महिलांसाठी सामजिक व शारीरिक सुरक्षा यांची सविस्तर अशी माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली, बाल विवाह मुक्त अभियानाची शपथ घेण्यात आली आणि गावातील महिला सक्षमीकरणा साठी काम करणाऱ्या महिला सन्मान म्हणून CRP, FLCRP, आरोग्य सखी, ग्राम संघाच्या अध्यक्ष,लिपिक, बचत गटाच्या अध्यक्षा व सचिव यांचा शाल व हार घालून सत्कार करण्यात आला.
यावेळी गावचे माजी सरपंच राज गुणाले, सरपंच कोमल गुणाले, ग्रामसेवक श्यामसुंदर क्षीरसागर, ग्राम पंचायत सदस्य स्वाती कासले तर प्रमुख मार्गदर्शक तथा प्रमुख पाहुणे म्हणून देवणी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माणिक डोके व दक्षता समितीच्या तालुका समन्वयक रंजना पोलकर आणि गावातील महीला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.