शैक्षणिक संस्थाचालक शेख निसार अहेमद गफार याने केला महिला मुख्याध्यापिकेचा विनयभंग !

0
शैक्षणिक संस्थाचालक शेख निसार अहेमद गफार याने केला महिला मुख्याध्यापिकेचा विनयभंग !

शैक्षणिक संस्थाचालक शेख निसार अहेमद गफार याने केला महिला मुख्याध्यापिकेचा विनयभंग !

लातूर (एल.पी.उगीले) : लातूर तालुक्यातील बोरी येथील मियाॅंसाब शैक्षणिक व सेवाभावी संस्था संचलित कमला नेहरू प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापिकेचा संस्थेचा उपाध्यक्ष असलेल्या व शिरूर आनंतपाळ तालुक्यातील मौजे कांबळगा येथील याच संस्थेच्या साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातून मुख्याध्यापक व प्राचार्य पदावरून सेवानिवृत्त झालेल्या निसार शेख यानी हा विनयभंग केला आहे. 
 लातूर ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये कमला नेहरू प्राथमिक शाळा बोरी येथील मुख्याध्यापिका श्रीमती बसेरिया बेगम फारूकमिया इनामदार यांनी विनयभंग करणारा शेख निसार अहेमद गफार याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली असून लातूर ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 
श्रीमती इनामदार यांनी दिलेली तक्रारीनुसार दिनांक ५ मार्च २०२४ रोजी सकाळी ८.३० वाजता श्रीमती इनामदार शाळेमध्ये येऊन शाळेचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी ऑफिसमध्ये बसलेल्या असताना सकाळी ९ वाजता शाळेचे काही शिक्षक हजेरी पत्रकावर स्वाक्षरी करण्यासाठी आले. तेवढ्यात संस्थेचे उपाध्यक्ष असलेले शेख निसार अहेमद गफार हे तेथे आले व तुम्ही माझ्या पुतणीची गैरहजेरी का टाकता? असे म्हणून वाईट हेतूने इनामदार मॅडम यांचा  उजवा हात धरून व त्यांच्या हातातील हजेरीपट घेऊन धक्का मारून ढकलून दिले. त्यावेळी इनामदार मॅडम यांनी मी शासनाचा पगार घेते आणि नियमाप्रमाणे काम करते. तुमची पुतणी समीना पटेल ही शिक्षिका असून शाळेतच येत नाही. म्हणून मी तिची गैरहजरी टाकत आहे, असे म्हणाले असता शेख निसार अहेमद गफार यांनी इनामदार मॅडम यांना, तू इथून पुढे माझ्या पुतणीची अपसेंटी टाकून तर बघ, मी तुला दाखवतो. अशा भाषेत दमदाटी करून शिवीगाळ करतो.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *