नऊ ते अकरा मार्च या कालावधीत उदयगिरीचा उदयोत्सव
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम म्हणजेच उदयोत्सव, 9 मार्च ते 11 मार्च 2024 या कालावधीत संपन्न होणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन 9 मार्च रोजी सुप्रसिद्ध साहित्यिक राजेसाहेब कदम, अहमदपूर यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राम बोरगावकर तहसीलदार, उदगीर आणि अरविंद पवार,पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण हे राहणार आहेत. उदयोत्सव संमेलनातील विशेष आकर्षण म्हणजे आनंदनगरी, विविध गुणदर्शन, विज्ञान प्रदर्शन, उदयगिरीच्या इतिहासाची साक्ष देणारे फोटो प्रदर्शन, हे कार्यक्रम दिनांक 10 मार्च 2024 रोजी होणार आहेत. 11 मार्च रोजी पारितोषिक वितरण तसेच समारोप सोहळा संपन्न होणार आहे. यासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून प्रमिला लोदगेकर, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त कलावंत या राहणार आहेत. तसेच प्रमुख उपस्थिति म्हणून सुशांत शिंदे, उपविभागीय अधिकारी, उदगीर आणि तानाजी चेरले, पोलीस उपनिरीक्षक, उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन हे उपस्थित राहणार आहेत. तरुणाईच्या या आनंद उत्सवात उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी, उपाध्यक्ष डॉ.रेखा रेड्डी आणि अॅड.प्रकाश तोंडारे, सचिव रामचंद्र तिरुके, सहसचिव अॅड.एस.टी.पाटील चिघळीकर आणि डॉ.रामप्रसाद लखोटिया, कोषाध्यक्ष भालचंद्र चाकूरकर तसेच सर्व संस्था सदस्य, प्राचार्य डॉ.आर.के.मस्के, उपप्राचार्य डॉ.एस.जी.पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे.