महाशिवरात्रीच्या दिवशी शांतीदुत नावाच्या भगरेमुळे ब्रम्हवाडी येथील सहा जणांना विषबाधा
अहमदपूर (गोविंद काळे) : लालुक्यातील ब्रम्हवाडी येथे महाशिवरात्रीच्या दिवशी दि ८ मार्च रोजी उपवासाची शांतीदुत नावाची भगर शिजवुन खाल्यामुळे सहा जणांना बिषबाधा झाली असुन तिन जणांवर शासकीय ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरु आहेत.
याविषयी सविस्तर माहीती अशी की, तालुक्यातील ब्रम्हवाडी येथे महाशिवरात्रीच्या दिवशी दि ८ मार्च रोजी दुपारी अदाजे २:३० वाजता शांतीदुत नावाची पॅकेट मध्ये सिलबंद असलेली उपवासाची भगर शिजवुन खाल्ली असल्यामुळे सहा जणांना मळमळ, उलटी, पोटदुखी आदी प्रकारचा त्रास जाणवु लागल्यामुळे त्यांना अहमदपूर येथील शासकिय ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता तीघांवर प्राथमिक उपचार करून घरी पाठवण्यात आले असुन अन्य तिघांवर रुग्णालयात उपचार चालु आहेत.
साक्षी रामदास घुगे वय १३ वर्ष, केशव रामचंद्र घुगे वय ६५ बर्ष, कल्पना रामदास घुगे वय ३० वर्ष यांच्यावर शासकिय रुग्णालयात उपचार चालु असुन गोविंद रामदास घुगे वय ५९ वर्ष, स्वाती शिवदास घुगे वय ११ वर्ष, प्राची रामदास घुगे वय ८ वर्ष यांना प्राथमिक उपचार करून घरी पाठवण्यात आले असल्याची माहीती वैद्यकिय अधिकारी जयप्रकाश केंद्रे यांनी दिली.