साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या
योजनांसाठी 20 मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
लातूर (प्रतिनिधी) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळा मार्फत मांग, मातंग समाजातील व तत्सम 12 पोटजातीतील दारिद्रय रेषेखालील महिला, पुरुष घटकांची आर्थिक उन्नतीसाठी तसेच त्यांना स्वयंरोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध् करुन देण्यासाठी सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये एनएसएफडीसी योजनेअंतर्गत विविध योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी 20 मार्च 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सुविधा कर्ज योजना अंतर्गत 5 लाख रुपये कर्ज, महिला समृध्दी योजना अंतर्गत 1.40 लाख रुपये कर्ज आणि शैक्षणिक कर्ज योजनाचे कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या https://beta.slasdc.org या वेबपोर्टलवर ऑनलाईन स्वरुपात स्वीकारले जाणार आहेत. मातंग समाजातील गरजू शहरी तथा ग्रामीण भागातील लाभार्थी तसेच परितक्ता, विधुर, दिव्यांग, निराधार व्यक्तींना यामध्ये विशेष प्राधान्य देण्यात येईल. तरी इच्छुक लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करून त्याची एक प्रत जिल्हा कार्यालयात सादर करावी. ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा 20 मार्च, 2024 रोजी बंद करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बी विंग, तळमजला, लातूर येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन महामंडळाचे लातूर जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.