लालबहादुर शास्त्री प्राथमिक शाळेत माता-पालक मेळावा संपन्न

0
लालबहादुर शास्त्री प्राथमिक शाळेत माता-पालक मेळावा संपन्न.

लालबहादुर शास्त्री प्राथमिक शाळेत माता-पालक मेळावा संपन्न.

उदगीर (एल.पी.उगीले) : भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई द्वारा संचलित लालबहादुर शास्त्री प्राथमिक शाळेत मातृत्व, नेतृत्व,दातृत्व अंगी रुजवणाऱ्या , समाजासाठी सदैव समर्थपणे कार्य करणाऱ्या व भावी पिढी घडवणाऱ्या मातृशक्तीचा गौरव करण्यासाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सौ.आशालता तुकाराम कल्लूरकर यांनी माता पालक संघातर्फे माता पालक मेळाव्याचे आयोजन केले होते.या मेळाव्यासाठी अध्यक्ष म्हणून शालेय समिती अध्यक्ष व्यंकटराव गुरमे तर,प्रमुख अतिथी म्हणून सावित्रीबाई राज्य शिक्षक गुण गौरव पुरस्कार प्राप्त सौ.अनिता तुकाराम यलमटे,विश्व हिंदू परिषदेचे पूर्णवेळ कार्यकर्ते संतोषजी कुलकर्णी उपस्थित होते,तसेच व्यासपीठावर मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे,विभाग प्रमुख सुधाकर पोलावार व श्रीमती सुरेखाबाई कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
व्यासपीठावरील मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.गुलाबपुष्प देऊन सर्व मान्यवरांचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले.शाळेतील सहशिक्षक सुधाकर पोलावार व अतुल गुरमे यांना महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा जिल्हा स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच,संस्कृती ज्ञान परीक्षेत इयत्ता चौथी वर्गातील विशेष यश संपादन केलेल्या व सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा,उदगीरतर्फे आयोजित स्पर्धेत शाळेतील संघाने प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवल्याबद्दल प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. व अभिनंदन करून कौतुक केले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या अनिता येलमटे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त सर्व उपस्थित मातांना शुभेच्छा दिल्या. माता पालक मेळाव्यास उद्बोधित करत असताना आईचं नातं वेदनेशी जोडलेलं असतं.मुलांना नैराश्यातून बाहेर काढण्याचे काम मातांनी केले पाहिजे.अपयशाच्या वेळी साथ दिली पाहिजे.मातांनी मासाहेब जिजाऊ यांच्यासारखे आदर्श गुण आपल्या मुलांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करावा.आपल्या मुलावर अपेक्षांचे ओझे न लादता नेहमी सकारात्मक विचार ठेवून आपल्या पाल्याला प्रोत्साहित करावे.गोष्टीच्या रुपातून आईचे महत्त्व सांगितले.विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते संतोषजी कुलकर्णी यांनी आजची महिला सर्व क्षेत्रात सक्षम आहे.आपल्या मुलांवर योग्य संस्कार रुजवण्याचे कार्य माता पालकांनी करावे.आई ही प्रेमाची मुर्ती आहे.एकत्र कुटुंबाचे महत्त्व सांगितले.आपल्यातील दुरावा कमी होऊन सर्व नात्यांमध्ये मातृप्रेम जागृत व्हावे.असे मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय समारोपपर भाषणात शालेय समिती अध्यक्ष व्यंकटराव गुरमे यांनी आपल्या पाल्याच्या जडणघडणीत माता पालकांची खूप महत्वाची भूमिका आहे.एक आदर्श माता बनून आपल्या पाल्यास समजून घेऊन साथ देण्याचे आवाहन केले.प्रास्ताविक श्रीमती सुरेखाबाई कुलकर्णी यांनी केले.स्वागत व‌ परिचय सौ.श्रीदेवी कबाडेबाईंनी केले.वैयक्तिक पद्य सौ.दिपाली भावसार यांनी गाईले.सुत्रसंचलन सौ.अर्चनाताई सुवर्णकार यांनी केले तर, आभार माता पालक संघ प्रमुख सौ.आशालता कल्लूरकरबाईंनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *