माजी पोलीस पाटील तुकाराम भद्राजी देवणीकर यांना “डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार
देवणी (लक्ष्मण रणदिवे) : येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुंबईच्या वतीने नॅशनल सेंटर फार परफार्मिग आर्ट्स एनसीपीए जमशेद भाभा नाट्यगृह मुंबई या ठिकाणी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग येथे पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार माजी पोलीस पाटील तुकाराम भद्राजी देवणीकर यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये सन्मान सत्कार करून सन्मान चिन्ह व पंचवीस हजार चेक सुपूर्द करण्यात आला.हा पुरस्कार स्वपत्नीक स्वीकारण्यात आला आहे,दलित, शोषित, समाजाच्या कल्याणासाठी कार्य करनाऱ्या व्यक्तिस व संस्थेस दरवर्षी डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार कालावधीसाठी दिले जातात. गेल्या दोन वर्षी हे पुरस्कार जाहीर झाले नव्हते. 2020 व 2021 या वर्षातील “डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार” देवणी तालुक्यातील देवणी खु,येथील रहिवासी असलेले व माजी पोलीस पाटील म्हणून काम केलेले तथा साहित्यिक, पुरोगामी चळवळीचे अभ्यासक, फुले, शाहु, आंबेडकर चळवळीचे अहोरात्र काम करणारे गावात गोरगरीब लोकांना न्याय देऊन काम करणारे देवणी खुर्द व देवणी शहरात पोलीस पाटील या कामाचा मोठा अनुभव असणारे तुकाराम भद्राजी देवणीकर यांना महाराष्ट्र शासनाचा डॉ, बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. हा पुरस्कार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्व मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये फार मोठा सन्मान सत्कार करण्यात आले आहे, यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार,ना. संजय भाऊ बनसोडे , मंगल प्रभात लोंढा मंत्री कौसल्या रोजगार उद्योजकता तथा पालकमंत्री मुंबई उपनगर, अरविंद सावंत,सुमंत भांगे, ओम प्रकाश बकोरिया, वंदना कोचुरे,अनिल कांबळे, सुजाता देवणीकर, भैय्यासाहेब देवणीकर, संगमित्रा देवणीकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. हा पुरस्कार, सन्मान प्राप्त झाल्याबद्दल देवणी तालुक्यातील बहुजन चळवळीतील सर्वांनी अभिनंदन केले आहे.