राष्ट्र संत डाॅ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा 108 वा जन्म दिवस साजरा
उदगीर (एल.पी.उगीले) : राष्ट्रसंत डाॅ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा 108 वा जन्म दिवस उदगीर येथील भक्त सौ.उमादेवी अशोक स्वामी परिवाराच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला.राष्ट्रसंत डाॅ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा तिथी प्रमाणे जन्मदिवस उदगीर येथील भक्त सौ.उमादेवी अशोक स्वामी परिवाराच्या वतीने साजरा केला जातो. सोमवार दि.11मार्च रोजी एक दिवसाचे 71 महिलांचे परमरहस्य ग्रंथाचे पारायण संपन्न झाले, तर दि. 12 मार्च 2024 रोजी अकरा रुद्राचा रुद्रभिषेक, महिलांचे शिवभजन व जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला .यावेळी अहमदपूर येथील लिंगेश्वर महिला भजनी मंडळ अहमदपुर ,सिध्दरामेश्वर महिला भजनी मंडळ,बसवनकेरी महिला भजनी मंडळ, विरेश्वर महिला भजनी मंडळ,तपसिध्देश्वर भजनी मंडळ हावगी स्वामी महिला भजनी मंडळ,मन्मथ स्वामी महिला भजनी मंडळ सोमनाथपूर, नवशा महादेव महिला भजनी मंडळ, ओंकारेश्वर महिला भजनी मंडळ, यांच्यातर्फे जन्मोत्सव सोहळा व पाळणा संपन्न झाला.यावेळी गणेश महाराज उमाटे तमलूरकर यांनी राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराजांची वेषभूषा धारण केली होती.
शि.भ.प. उध्दव महाराज हैबतपुरे, शि.भ.प. शिवराज नांवदे गुरुजी, शिवलिंग पाटिल, बसवराज बाळे, रामलिंग स्वामी,गंगाधर माळेवाडीकर, नागनाथ स्वामी माळेवाडीकर, आदी उपस्थित होते.
यावेळी बसवराज बाळे यांनी गुरु माऊलींची महती सांगीतली, शि.भ.प. गणेश उमाटे यांनी स्पष्ट केले की, विरशैव धर्माची पताका यापुढे अविरत फडकवण्याचे कार्य करायचे आहे. सौ.महादेवी बिरादार जन्मोत्सव सोहळ्याचे संचलन रतिकांत स्वामी महाराज तोंडारकर, तर आभार डाॅ.अश्विनी ईटकर स्वामी यांनी मानले. राष्ट्रसंत डाॅ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा कार्यक्रमास उदगीर व परिसरातिल महिला पुरुष भक्तगण मोठ्या संखेने उपस्थित होते.