मतदार संघातील ५३ कि.मी. च्या रस्त्यासाठी ३०१ कोटी रुपयाचा निधी मंजुर

0
मतदार संघातील ५३ कि.मी. च्या रस्त्यासाठी ३०१ कोटी रुपयाचा निधी मंजुर

मतदार संघातील ५३ कि.मी. च्या रस्त्यासाठी ३०१ कोटी रुपयाचा निधी मंजुर

क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांची माहिती

उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर – जळकोट मतदार संघातील अनेक गावे गेल्या कित्येक वर्षापासून रस्त्यापासुन वंचित होते. त्यामुळे तेथील ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती तर काही रस्त्यांची दुर्दशा झाल्यामुळे अपघात होत होते ही बाब नामदार संजय बनसोडे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून अनेक वाडी, तांडे व गावे विकासापासून दूर होते त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन दरबारी मागणी करुन कोट्यावधी रुपयाच्या निधीची तरतुद करुन तो निधी मंजूर करुन घेतला. त्यातच आपल्या मतदार संघात दळणवळण वाढली पाहिजे म्हणून उदगीर व अहमदपुर मतदारसंघातुन नांदेड जिल्हा व जिल्हा सरहद्द पर्यंत जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांची कामे हायब्रीड अॅन्युइटी मोड (HAM) अंतर्गत मंजूरी देण्याबाबत निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी केली होती. ती मागणी मान्य करुन सदर
चाकुर-शेळगाव-किनी यल्लादेवी- वाढवणा-घोणशी-गुत्ती-अतनुर रस्ता रा. मा. २६८ (कि.मी.) ०/०० ते ते ४३/६०० या रस्त्याला मंजुरी देवुन तब्बल ३०१ कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे.

गेल्या कित्येक वर्षात अनेक लोकप्रतिनिधी होऊन गेले पण छोट्या गावात व वाडी तांड्यावर कोणीच लक्ष दिले नव्हते मात्र मतदार संघातील एका एका गावात अनेकवेळा जावुन नागरीकांच्या अडचणी समजून घेवुन मतदार संघात रस्त्याच जाळ निर्माण करणारे ते एकमेव आमदार व मंत्री असावेत अशी प्रतिक्रिया मतदार संघातून ऐकवयास मिळत आहे.
चाकुर-शेळगाव-किनी यल्लादेवी- वाढवणा-घोणशी-गुत्ती-अतनुर हा रस्ता झाल्याने या भागातील नागरिकांना या रस्त्याचा मोठा फायदा होणार असल्याने या भागातील नागरिकांनी क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *