सताळा बु. शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत प्रथम पारितोषक

0
सताळा बु. शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत प्रथम पारितोषक

सताळा बु. शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत प्रथम पारितोषक

उदगीर (एल.पी.उगीले) : तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा सताळा (बु.) मुख्यमंत्री माझ शाळा सुंदर शाळा या उपक्रमात प्रथम आली आहे. उदगीर तालुक्यातील शांतीनिकेतन, वाबळेवाडी समजली जणारी शाळा 30 उपक्रम राबवून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात प्रथम आली आहे.
या शाळेने सतत 5 वर्ष मेहनत घेउन 85 उपक्रम राबवून वेगवेगळ्या ठिकाणच्या आदर्श समजल्या जाणाऱ्या 165 शाळेनी भेटी दिलेली ही शाळा, स्वच्छ व सुंदर उपक्रमशील शाळा असून बाला उपक्रमात या शाळेचे उपक्रम राज्यात नावलौकिक प्राप्त केलेले आहेत. उपक्रमशील शाळेत धुळपाटी, सांगा पाहू मी किती, नेमबाजीतून गणित अध्ययन, परसबाग, ठिबकसिंचन, गांडूळ खत निर्मिती, औषधं वनस्पती, मियावाकी रोपवाटिका, वॉटर हार्वेस्टिंग,आमची बँक, हावभावातून इंग्रजी नावे, शब्द, हावभावातून अंक ओळखणे, गणिती क्रिया करणे हा उपक्रम विशेष आनंदातून शिक्षण, टाकाऊतून टिकाऊ वस्तू निर्मिती, यातून विद्यार्थ्यांना सर्जनशीलतेला वाव देणारे स्मरण वर्तुळ यातून अवधान निर्मिती करणे,यासारखे अनेक उपक्रम राबवून शाळा नावा रुपाला आली.यासाठी गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर , गटशिक्षणाधिकारी शेख शफ़ी, विस्ताराधिकारी शिवशंकर पाटील, व्यंकट बोईनवाड, केंद्रप्रमुख रमेश जाधव,केंद्रप्रमुख राघोबा घंटेवाड यांचे मोलाचे मार्गदर्शन झाले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष रामचंद्रजी तिरुके, सरपंच कुसुमताई तिरकोळे , उपसरपंच सचिनजी सुडे, अध्यक्ष धाराशिवे सिद्धेश्वर, माजी सरपंच शिवलिंगप्पा जळकोटे, काशिनाथप्पा पाटील, राजू शिंदाळकर ग्रामसेवक माचे यांनी सहकार्य केले. या शाळेचे मुख्याध्यापक संजय मळभागे, शंकर गुरुडे, राजकुमार शिवशिवे, पांडे दिगंबर,दीपक जामकर, सुलोचना आगलावे, , गेंदेवाड शिवाजी, श्रीकांत कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले. निसर्गाच्या वातावरणात असलेली सुंदर शाळा उपक्रमशील बनवण्यात शिवशिवे राजकुमार व दीपक जामकर यांचा मोलाचा वाटा आहे. सर्व स्तरातून शाळेचे कौतुक व अभिनंदन होत आहे. 900 झाडें, सुंदर परसबाग, सुंदर निसर्गातील शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षण यामुळे ही शाळा परिसरात सुंदर आहे. शाळेने केलेल्या कामाची पावती म्हणून शाळेचा नावलौकिक सर्वत्र आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *