आमदार बाबासाहेब पाटील यांच्या पाठपुराव्याला यश !
अहमदपूर चाकूरच्या रस्ते कामांसाठी सुमारे ५०० कोटींचा निधी मंजूर..
अहमदपूर (गोविंद काळे) : हायब्रीड अन्यूटी अंतर्गत अहमदपूर चाकूर मतदारसंघातील रस्ते विकास कामांसाठी आ. बाबासाहेब पाटील यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री मा. अजित पवार यांच्याकडे मागणी केली होती. यावर काल झालेल्या मंत्रिमंडळ निर्णयात अहमदपूर तालुक्यातील सांगवी उजना हिप्परगा सुमठाना ढाळेगाव अंधोरी किनगाव कारेपूर रेणापूर रस्त्यासाठी २६१ कोटी ४ लक्ष ७० हजार ६२० तसेच चाकूर तालुक्यातील शेलगाव किनी ( यल्लादेवी) वाढोना घोणसी, गुट्टी अतनुर धर्माबाद ते राज्य सरहद्द रस्ता रामा रस्ता रुंदीकरणासह सुधारणा करण्यासाठी एकूण २३० कोटी ५१ लक्ष २७ हजार २६९ रुपयांचा निधी मंजूर झाला असून आमदार बाबासाहेब पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. अहमदपूर चाकूर येथील दोन्ही रस्त्याच्या कामांसाठी सुमारे ५०० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री व राज्य शासनाचे बाबासाहेब पाटील यांनी आभार मानले आहेत.
आमदार बाबासाहेब पाटील यांच्या माध्यमातून गेल्या ४ वर्षात कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करून घेत अनेक रस्त्याची कामे झाली. मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर दळणवळणाची व्यवस्था उत्तम असली पाहिजे या दृष्टीकोनातून आमदार बाबासाहेब पाटील यांनी रस्ते कामांवर भर दिला आहे. मतदारसंघात होत असलेल्या कामामुळे नागरिकांकडून देखील समाधान आणि आभार व्यक्त केले जात आहे.
कोट –
अहमदपूर चाकूर मधील कामांना मंजुरी दिल्याबद्दल राज्य शासनाचे आभार व्यक्त करतो. आपल्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत तर काही पूर्णत्वास जात आहेत. सर्वांगीण विकास साधायचा असेल तर दळणवळणाची सोय उत्तम असायला हवी याच दृष्टीकोनातून मी देखील रस्ते आणि पायाभूत सुविधांवर भर देत सर्वांगीण विकास साधत आहे. यापुढील काळात देखील मतदारसंघातील जनतेच्या साथीने आणि विश्वासाने नक्कीच विकास साधला जाईल.