नगर परिषदे तर्फे महिला बचतगटातील सदस्यांचे आर्थिक साक्षरता प्रशिक्षण संपन्न”

0
नगर परिषदे तर्फे महिला बचतगटातील सदस्यांचे आर्थिक साक्षरता प्रशिक्षण संपन्न”

नगर परिषदे तर्फे महिला बचतगटातील सदस्यांचे आर्थिक साक्षरता प्रशिक्षण संपन्न”

उदगीर (एल.पी.उगीले) : नगर परिषदेतर्फे महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी आर्थिक साक्षरता प्रशिक्षण शिबिर गुरुवार दिनांक १४ मार्च २०२४ रोजी उदगीर नगरपरिषद, दीनदयाळ अंत्योदय योजना,राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत मुख्याधिकारी सुंदर बोंदर यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक महिला दिन सप्ताह निमित्त महिला बचतगटातील सदस्यांचे आर्थिक साक्षरता प्रशिक्षण संपन्न झाले.
प्रशिक्षणाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. मुख्याधिकारी यांच्या संकल्पनेतून जागतिक महिला दिना निमित्त उदगीर नगरपरिषद कार्यलयातील सर्व महिला अधिकारी, कर्मचारी, प्रातिनिधिक महिला सफाई मित्र यांचा सन्मान करण्यात आला.
उपस्थित महिला बचतगटातील सदस्यांना मार्गदर्शन करतांना लक्ष्मण सरंबळकर, प्रबंधक भारतीय स्टेट बँक मुख्य शाखा उदगीर यांनी महिला बचत गटातील सदस्यांना बँकेच्या योजनाचा लाभ घेण्याबद्दल आवाहन करत त्यांनी सुकन्या योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा, वैयक्तिक अपघात विमा, कर्ज प्रस्ताव परिपूर्ण, कर्ज विहित वेळेत परत फेड या विषयी सविस्तर माहिती दिली.
युवराज खेडकर, शाखा व्यवस्थापक यांनी महिला बचतगटाची पंचसूत्री, फिरता निधी, बँक कर्ज प्रस्ताव परिपूर्ण कसा असावा, बँक महिला बचत गटांना बचतीच्या सहा पट कर्ज देते, नियमित परत फेड यासह सर्व सदस्यांनी स्वत: व कुटुंबातील सदस्यांचा प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा या कमी कमी रक्कम असलेल्या विमा योजनाचा लाभ घ्यावा.
डॉ.माधवी जाधव, स्त्री रोग तज्ञ, उपजिल्हा रुग्णालय उदगीर यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करतांना महिलांनीच आपले आरोग्य जपावे, महिला या यशोमती आहेत, महिलांनी स्वत: आणि कुटुंबातील सदस्यासाठी सकस व सर्व प्रकारचे व्हिटामिन व घटक असणारे अन्न बनवावे. जेवताना ताट हे पूर्ण भरलेले असावे, ज्यात भाकरी, चपाती, दही, लिंबू, पाले भाज्या, डाळी, मोड आलेले कडधान्य या सर्वांचा सहभाग असावा. आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी चालणे, सायकलिंग, पोहणे, प्राणायाम योगासने इ. व्यायाम आवश्यक आहे. वेळेचा सदुपयोग करावा, मोबाईलचा अति वापर टाळावा, महिलांनी मासिक पाळी दरम्यान घ्यावयाची काळजी बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
अनिता येलमटे, आदर्श शिक्षिका, तज्ञ प्रशिक्षक यांनी महिलांशी संवाद साधताना आपण एकत्र येण्यामागे सर्वात मोठे योगदान क्रांत्रीज्योती सावित्रीमाईचे आहे. आपण महिला राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, साहित्य, प्रशासन, क्रीडा सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. पुरुषांना विनाकारण आपण बोलतो परंतु महिलाच महिलांच्या शत्रू आहेत, असे आपण का वागतो? मोठ्या मनाने मुली प्रमाणेच सुनेला हि सांभाळावे. आपण महिला मल्टी टास्कींग ऑफिसर आहोत. बचत गटाच्या माध्यमातून महिला आर्थिक सक्षम होण्यासाठी मोठी संधी उपलब्ध आहे. त्यानुसार या संधीचे सोने करत आर्थिक स्वावलंबी होता येईल, त्यासाठी गटाचे दर्जेदार पदार्थ /वस्तू निर्मिती करून सामाजिक माध्यमाच्या मदतीने आणि स्वतः विक्री व्यवस्थापन कौशल्य आत्मसात करून करावे. आपण सर्व पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करत आहोत. हे अनुकरण थांबवण्याकरिता महिलांची भूमिका फार मोठी असेल, आपण आपल्या कुटुंबाला वाचवायचे असेल तर पुस्तक वाचनाची सवय लावावी लागेल. बाजारात अनेक दर्जेदार पुस्तके उपलब्ध आहेत त्याचा उपयोग करावा.
उपस्थित महिलांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे, यासाठी बचत गटाच्या माध्यमातून झालेले स्व: परिवर्तन यशोगाथा एनयुएलएम सीआरपी अनिता चौधरी व उमेद अभियानाच्या सीआरपी गोदावरी शिंदे यांनी आपला गटात येण्यापूर्वी पासून ते आज तागायत झालेला विकासात्मक वास्तव बदल चित्र मांडले.
कार्यक्रमास उपमुख्याधिकारी सतीश बिलापटे, महेश शिंदे, न.प. कार्यालयातील सर्व महिला अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहर अभियान व्यवस्थापक महारुद्र गालट यांनी केले तर आभार विशाल गुडसूरकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी समुदाय संसाधन व्यक्ती अनिता चौधरी, शिल्पा काळे, सुवर्णा धुळेकर, स्मिता ठाकूर यांनी मेहनत घेतली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!