स्त्रीचा सन्मान म्हणजे देशाचा सन्मान – माजी सभापती सौ. अयोध्याताई केंद्रे
प्राचार्य डॉ वसंत बिरादार यांच्या संकल्पनेतून महात्मा फुले महाविद्यालयात कर्तृत्ववान महिलांचा पुरस्कार देऊन सन्मान कार्यक्रम संपन्न …
अहमदपूर (गोविंद काळे) : समाज सेवा हीच खरी देशसेवा आहे. गरजूंच्या कमी पडणे, भुकेल्यांना अन्न देणे या कार्यातूनच खरी मानवता जन्म घेते व विविध क्षेत्रातील स्त्रिया अशा प्रकारे कार्य करतात त्या स्त्रियांचा सन्मान म्हणजे देशाचा सन्मान आहे,असे स्पष्ट प्रतिपादन अहमदपूर पंचायत समितीच्या माजी सभापती सौ अयोध्या ताई केंद्रे यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या समाजशास्त्र व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या जागतिक महिला दिनाचे औचित्य ‘कर्तृत्ववान महिलांचा सन्मान ‘ या कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो. डॉ . दुर्गादास चौधरी हे होते. तर विचारमंचावर सौ .अयोध्याताई केंद्रे , वत्सलाबाई लामतुरे, सौ कविता राठोड , सौ मीनाक्षी शिंगडे , शारदा भूपाळ, सौ कमलबाई सूर्यवंशी , सुप्रिया साबळे , शेख साबेरा आली चांद , डॉ सीमा उप्पलवार, प्रा .कल्पना कदम, प्रा. प्रतीक्षा मंडोळे , डॉ . प्रशांत बिरादार, अजय मुरमुरे , चंद्रकांत धुमाळे यांच्यासह कार्यक्रमाचे संयोजक डॉ. सतीश ससाणे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलतांना सौ. अयोध्याताई केंद्रे म्हणाल्या की, शैक्षणिक क्षेत्रात कार्य करत असताना सामाजिक जाणीव ठेवून महात्मा फुले महाविद्यालयाच्या वतीने प्रत्येक वर्षी जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात येतो. या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे समाजभिमुख व्यक्तिमत्व आहेत , असे ही त्या म्हणाल्या यावेळी सौ. मीनाक्षी शिंगडे, सौ कविता राठोड , डॉ. प्रशांत बिरादार यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच समाजशास्त्र विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘संस्कार’ या भितीपत्रकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपाप्रसंगी उपप्राचार्य प्रो डॉ . दुर्गादास चौधरी म्हणाले की, कर्तुत्ववान पुरुषाला घडविण्याचे कार्य महिला करते. त्या कर्तुत्वान पुरुषापेक्षा त्याला घडविणारी महिलाच खरी कर्तृत्ववान असते, तिचा सन्मान प्रत्येक घटकांनी करणे आवश्यक आहे. स्त्रीचा सन्मान हा समाजाबरोबर राष्ट्राचा ही सन्मान आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते कालकथित सीताबाई गंगाराम ससाणे राज्यस्तरीय नारी शक्ती सन्मान पुरस्कार वत्सलाबाई लामतुरे यांना तर ; कर्तृत्ववान महिला सन्मान पुरस्कार अहमदपूर पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. अयोध्याताई केंद्रे , गुणवंत शिक्षिका पुरस्कार सौ . कविता राठोड , नारी उद्योग रक्त पुरस्कार सौ.मीनाक्षी शिंगडे, क्रीडा रत्न नारी पुरस्कार शारदा भूपाळ ,सरपंच नारी गौरव पुरस्कार कमलबाई सूर्यवंशी, युवती रत्न पुरस्कार कु. सुप्रिया बालाजी साबळे, सिस्टर /दायिनी रत्न पुरस्कार शेख साबेर अली यांना देण्यात आला. तसेच
जिजाऊ -सावित्री’ व ‘कन्यारत्न’ पुरस्कार महाविद्यालयात कार्यरत असलेल्या प्राध्यापक महिलांना ‘जिजाऊ – सावित्री’ सन्मान सौ. प्रा.डॉ. सीमा उप्पलवार, प्रा. कल्पना कदम, प्रा. सौ.प्रतीक्षा मंडोळे यांना देण्यात आला. तसेच ज्या प्राध्यापक, कर्मचारी बंधुनी आपल्या दोन मुलींना मुलेच समजलेले आहेत असे आदर्श पिता डॉ. प्रशांत बिरादार, अजय मुरमुरे व चंद्रकांत धुमाळेयांना कन्यारत्न पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजशास्त्र विभाग प्रमुख तथा कार्यक्रमाचे संयोजक डॉ. सतीश ससाणे यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. मारोती कसाब यांनी व आभार प्रो. डॉ . अनिल मुंढे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.