सामाजिक संस्थेमुळे भागते बस स्थानकात प्रवाशांची तहान
अहमदपूर (गोविंद काळे) : शहरातील बसस्थानकात स्व श्रीमती जानकबाई श्रीरामजी व्यास यांच्या पुण्यस्मरणार्थ श्रीराम जानकी भवन व रोकडेश्वर सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अहमदपूर बस स्थानकात गेल्या 17 वर्षापासून प्रवासासाठी पानपोई लावली जाते.
जीवन जगत असताना आपण समाजाचं काही देणं लागतो या उद्देशाने तीन रांजण ठेवून सुरू केलेल्या पाणपोईमुळे प्रवाशांना भर उन्हाळ्यात मोठा आधार मिळत असून ये- जा करणाऱ्या प्रवाशांची तहान या पानपोईमुळे भागत आहे
उन्हाळ्याची चाहूल लागताच जनसेवेच्या भावनेतून पाणपोई उभारण्यासाठी सामाजिक संस्था दिवसेंदिवस कमी होऊ लागले आहेत. कधीकाळी प्रत्येक चौकात दिसणारी पाणपोई आता शहरातील कोणत्यातरी भागात दिसून येत आहे यापूर्वी अहमदपूर बस स्थानकात प्रवाशांसाठी थंड पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती प्रवाशांची होणारी गैरसोय पाहून शहरातील या संस्थेच्या वतीने पाणपोई सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला.
सामाजिक संस्थेने तीन रांजणाच्या माध्यमातून पाणपोई सुरू केली.दररोज स्वच्छ पाण्याने रांजणे भरून ठेवली जातात भर उन्हाळ्यात या पानपोईचा आधार प्रवाशांना मिळत आहे तसेच या संस्थेकडून शहरात सतत धार्मिक सामाजिक उपक्रम राबवले जातात या पाणपोईचे उद्घाटन अहमदपूर नगर परिषदेचे आयएएस मुख्याधिकारी श्री नमन गोयल यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगार प्रमुख पृथ्वीराज कोकाटे साहेब हे होते.आपल्या उद्घाटक भाषणात मुख्याधिकारी साहेब यांनी संस्थेच्या कार्याबद्दल शुभेच्छा दिल्या आणि त्यांना नागरिकांनी आठवड्यातून एकदा नळाला पाणी येतो असा प्रश्न विचारला असता आता मी आलो आहे योग्य उपाययोजना करून दोन दिवस आड शहराला पाणीपुरवठा करेन असे आश्वासन दिले
याप्रसंगी श्रीराम जानकीभवन चे अध्यक्ष राधेश्याम पुरोहित सचिव जुगलकिशोरज शर्मा नितीन धर्माधिकारी, प्रा मारुती बुद्रुक पाटील, दिनकर मदेवाड माहेश्वरी महासभाचे अध्यक्ष- सचिन बजाज, सचिव- आनंद बाहेती युवा माहेश्वरी चे अध्यक्ष- रविराज भुतडा, सचिव- गिरीश बाहेती, गोपाल शर्मा, विनोद भुतडा, महेश पाटील, गणेश शर्मा, श्रीकांत शर्मा, सोमनाथ पुणे, दिनेश सोनी, गणेश शर्मा भागवत सोलीवाल, बालू मेनकुदळे, माणिक गुळवे सचिन बजाज आदींची उपस्थिती होती.