अतनूर परिसरातील २८ गाव-तांडा-वस्ती-वाडीत मतदान जागृती

0
अतनूर परिसरातील २८ गाव-तांडा-वस्ती-वाडीत मतदान जागृती

अतनूर परिसरातील २८ गाव-तांडा-वस्ती-वाडीत मतदान जागृती

उदगीर (एल.पी.उगीले) : जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षाताई ठाकूर-घुगे, उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांच्या निर्देशनुसार व सौ.सुरेखा स्वामी तहसीलदार जळकोट यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी सज्जा अतनूर येथे स्वीप अंतर्गत अतनूर परिसरातील २८ गावातील वाडी-तांडा-वस्तीत विविध कार्यक्रम घेऊन मतदार जनजागृती करण्यात आली. सदर मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन अतनूर सज्जाचे तलाठी अतिक शेख व घोनसी मंडळाचे मंडळअधिकारी राजेंद्र कांबळे यांनी मौजे मरसांगवी येथे कार्यक्रम घेऊन लोकांना मतदानाचे महत्व सांगितले. तसेच मतदान करण्यासाठी जागृत केले. तसेच गव्हाण, चिंचोली व मेवापूर येथे विविध कार्यक्रम घेऊन लोकांना मतदान करण्यास प्रोत्साहित केले. सदर कार्यकामात गावातील बीएलओ, सरपंच, पोलीस पाटील, सोसायटी चे चेअरमन ई.नी सहकार्य केले. तेव्हापासून आजतागायत व आगामी काळात अतनूर परिसरातील २८ गावातील वाडी-तांडा-वस्तीत स्थानिक लातूर जिल्हा युवक कुणबी मराठा मंडळ उदगीर, अतनूर, जनक्रांती डोंगरी विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अतनूर, जिजामाता महिला मंडळ अतनूर, वसुंधरा महिला मंडळ उदगीर, अतनूर, जय हिंद क्रीडा मंडळ व व्यायामशाळा अतनूर, महाराष्ट्र ग्राहक संरक्षण परिषद शासन नियुक्त अशासकीय सदस्य बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर तसेच ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य व पोलीस दक्षता समितीच्या वतीने पथनाट्यच्या माध्यमातून मतदान जनजागृती करण्यात येत आहे. गावोगाव “मतदान करायला जायचे आहे आपले कर्तव्य बजवायचे आहे” या कार्यक्रमातून जनजागृती सुरू आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *