भारतीय जनसंसदेच्या जिल्हा अध्यक्ष पदी हनिफ शेख यांची निवड
अहमदपूर (गोविंद काळे) : सामाजिक चळवळीत अग्रेसर असलेल्या भारतीय जनसंसदेच्या लातुर जिल्हा अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते हनिफ शेख यांची निवड जनसंसदेचे राज्य अध्यक्ष अशोक सब्बन यांनी नुकतीच करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचा मित्र परिवाराच्या वतिने सन्मान करण्यात आला.
येथील सामाजिक नेते तथा पद्मश्री अण्णा हजारे प्रणीत भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास चे लातूर माजी जिल्हाध्यक्ष हनिफ शेख यांचे कार्य सर्वपरिचीत असुन ते गेल्या ३५ वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर असतात त्यांच्या याच कामाची दखल घेत भारतीय जनसंसदेने घेतली असुन संसदेचे राज्याध्यक्ष आशोक सब्बन यांनी हनिफ यांचे लातूर जिल्हा अध्यक्ष पदी निवड केली असुन त्यांच्यावर लातूर जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे.भारतीय जनसंसदेच्या माध्यमातून देशभरातील गोरगिरीबांच्या अडचणी सोडविण्याचे काम सर्वोत्तम रित्या केले जाते संसदेणे अनेक प्रश्नांसाठी लढा देऊन सामाजिक प्रश्न सोडवीण्याचे काम केले आहे.
नुतन जिल्हाध्यक्ष हनिफ शेख यांच्या निवडीबद्दल त्यांचा मित्र परिवाच्या वतिने सन्मान करताना जिवनराव बोंडगे, बाबुअप्पा मिटकरी , भाजपाचे अँड.भारत चामे,डॉ. बासिदखान पठाण, काँग्रेसचे प्रकाश ससाणे,चंद्रकान्त आरसुळ, राजु शेख,अलिम शेख, आनंत जाधव, खय्युम शेख, नंदु यादव, विष्णु माने, रहिम शेख, महेश गायकवाड आदींसह अनेकांची उपस्थिती होती.