उशीरा लग्न आणि आनुवंशिक आजार यामुळे बालकात डाऊन सिंड्रोम आजाराची शक्यता – डॉ. होटुळकर

0
उशीरा लग्न आणि आनुवंशिक आजार यामुळे बालकात डाऊन सिंड्रोम आजाराची शक्यता - डॉ. होटुळकर

उशीरा लग्न आणि आनुवंशिक आजार यामुळे बालकात डाऊन सिंड्रोम आजाराची शक्यता - डॉ. होटुळकर

उदगीर (एल.पी.उगीले) : उशीरा लग्न झालेल्या 35 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांमध्ये डाऊन सिंड्रोम असलेल्या मुलाला जन्म देण्याचा धोका जास्त असतो. तसेच डाउन सिंड्रोम हा एक आनुवंशिक आजार आहे. हा आजार प्रामुख्यानं मुलांमध्ये दिसून येतो. आनुवंशिक कारणांमुळे मुलांमध्ये काही शारीरिक दोष निर्माण होतात. वैद्यकीय क्षेत्रात प्रगत तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. अशा तंत्रज्ञानाचा वापर करून या आजारा विषयीची तपासणी, निदान आणि उपचार शक्य आहेत. मात्र यासाठी पालकांनी विशेष जागरूक असणं गरजेचं आहे.असे डॉ. होटूळकर यांनी सांगितले . सक्षम दिव्यांग सेवा केंद्र उदगीर आणि कस्तुराबाई नर्सिंग स्कूल द्वारा जागतिक डाऊन सिंड्रोम दिन मातृभूमी प्रतिष्ठान च्या कस्तुराबाई नर्सिंग स्कुल मध्ये साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्य उषा कुलकर्णी तर प्रमुख पाहुणे म्हणून फिजिशियन डॉ.संगमेश्वर दाचावार, बालरोग तज्ञ डॉ.शिवकुमार होटूळकर, कान नाक घसा तज्ञ डॉ. संजय कुलकर्णी, प्रा.डॉ. रविकांत पाटील उपस्थित होते .
जागतिक डाऊन सिंड्रोम दिनानिमित्त आयोजित जनजागृती कार्यक्रमाच्या प्रास्तविकात डॉ. संजय कुलकर्णी यांनी ‘सक्षम’ या राष्ट्रीय संघटनेची उद्दिष्टं, कार्यपद्धती आणि उदगीर येथे नव्याने सुरु करण्यात आलेल्या ‘सक्षम दिव्यांग सेवा केंद्र’ याविषयी माहिती सांगितली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा बिभीषण मद्देवाड यांनी केले तर आभार प्रा.डॉ. रविकांत पाटील यांनी मानले . यावेळी रेखा रनक्षेत्रे , आकाश राठोड , रेखा रणक्षेत्र , राहूल जाधव, उषा साताळकर यांच्यासह प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *