लालबहादुर शास्त्री प्राथमिक शाळेचे शाळाबाह्य स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश.

0
लालबहादुर शास्त्री प्राथमिक शाळेचे शाळाबाह्य स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश.

उदगीर (एल.पी.उगीले): भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई द्वारा संचलित लालबहादुर शास्त्री प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी नेहमी मार्गदर्शन केले जाते. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये घेण्यात आलेल्या ऑलिम्पियाड, अबॅकस, भगवत गीता पठण इत्यादी स्पर्धा परीक्षेत इयत्ता दुसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
इयत्ता दुसरी वर्गातून कु.समृध्दी संदिप बोधनकरने गोल्ड मेडल व प्रमाणपत्र, शिवम नरहरी पुंड अबॅकसमध्ये द्वितीय ,रुद्र नागनाथ खंदाडे अबॅकसमध्ये प्रथम,बस्वराज बुक्का भगवत गीता पठणमध्ये द्वितीय,पद्मजा शिलरत्न शेल्हाळकर भगवद्गीता पठणमध्ये तृतीय.आदिनाथ भगवान पाटील ऑलिम्पियाडमध्ये व अबॅकसमध्ये गोल्ड मेडल व प्रमाणपत्र प्राप्त केले.
इयत्ता तिसरी वर्गातून कु.श्रुती प्रल्हाद मुळजे व आरोही प्रल्हाद मुळजे यांनी विज्ञान, इंग्रजी व गणित विषयात विशेष प्राविण्यासह ब्रॉंझ मेडल व प्रमाणपत्र तसेच, अबॅकसमध्ये गोल्ड मेडल व प्रमाणपत्र मिळवले.गणेश उमेश पाटील ऑलिम्पियाडमध्ये तीन सुवर्णपदके व प्रमाणपत्र तर, नामदेव सूर्यकांत केंद्रे याने सुवर्णपदक व प्रमाणपत्र मिळवले.
इयत्ता चौथी वर्गातून चि.सात्विक सचिन जाधव याने अबॅकसमध्ये गोल्ड मेडल व प्रमाणपत्र तसेच,आरोही केदार पोवारने अबॅकसमध्ये गोल्ड मेडल व प्रमाणपत्र मिळवले.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे भा.शि.प्र.संस्थेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा स्थानिक समन्वय समिती कार्यवाह शंकरराव लासुणे,स्थानिक समन्वय समिती अध्यक्ष मधुकर वट्टमवार, शालेय समिती अध्यक्ष व्यंकटराव गुरमे,सर्व संस्था पदाधिकारी तसेच मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे,विभाग प्रमुख सुधाकर पोलावार,श्रीमती सुरेखाबाई कुलकर्णी व सर्व शिक्षक बंधू -भगिनींनी अभिनंदन व कौतुक केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *