राज्यात लोडशेडिंग नसताना देवणी शहरात व वागदरी फिडरवर दररोज विद्युत पुरवठा खंडीत
देवणी (लक्ष्मण रणदिवे)
सध्या सर्वत्र उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, तापमानाचा पारा चढल्याने गरमीचा उकाडा वाढला आहे.सध्या रमजानचा पवित्र महिना सुरु आहे.अशातच शहराचा दररोज पहाटेला विद्युत पुरावठा खंडित केला जातोय,यामुळं नागरिक उकड्याने हैराण होत आहेत.
शहरातील नागरिक भल्या पहाटेपासून एमएसइबीच्या लाईन मॅन,ऑपरेटरला फोन वरून विचारपूस करत आहेत, संबंधित ऑपरेटरकडून नेहमी उदगीर वरून लाईट बंद केली जात असल्याचे कारण सांगितलं जातंय.एमएसइबीच्या अधिकारी यांना फोन केल्यानंतर अधिकारी फोन उचलत नाहीत, कामचुकार करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळं दररोज पहाटेच्या वेळी लाईट बंद होत असल्याने शहरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय, उकड्याचा सामना करावा लागतं आहे. तसेच वागदरी फिडरवर दररोज 2 ते 3 तास लोडशेडिंग केली जात आहे. राज्यात कुठेही लोडशेडिंग नसताना या भागात दररोज लोडशेडिंग केली जात आहे. व तसेच वारंवार लाईट ये-जा करत असते. लाईट सुरळीत मिळत नाही, तसेच अवकाळी पावसाच्या दोन थेंबाने 12 तास वागदरी फिडरवरील लाईट बेपत्ता होते. तरी पण लाईनमनचे इकडे दुर्लक्ष होते, यामुळं शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकामध्ये संतापच्या भावना व्यक्त होताना दिसून येत आहेत.तालुक्यातील अधिकारी मात्र उदगीर मध्ये वास्तव्यास असल्यामुळे त्यांना विजेचा लपंडाव व लोडशेडिंगशी काहीही देणेघेणे नाही, देवणी शहरातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील का?असा सवाल नागरिक करत आहेत.