चिमुकल्यांनी दिला घोषवाक्यातून मतदान जनजागृतीचा संदेश

0
चिमुकल्यांनी दिला घोषवाक्यातून मतदान जनजागृतीचा संदेश

अहमदपूर (प्रतिनिधी) : अहमदपूर तालुक्यातील लेंडेगाव येथे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी येणाऱ्या ७ मे रोजी गावातून जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी, स्वीप जनजागृती पथकाद्वारे मतदार जनजागृती करण्यात आली.यावेळी गावातील बालचिमुकल्यांनी विविध घोषवाक्याचे फलक घेऊन नवतरुणा साठी,वयोवृद्ध मतदार बंधूंसाठी मतदानाबद्दल जनजागृती केली.
मतदार राजा जागा,हो,लोकशाहीचा धागा हो…..! मतदानासाठी वेळ काढा, आपली जबाबदारी पार पाळा..!वाढवू तिरंग्याची शान,करुया देशासाठी मतदान..! न नशे से,न नोट से,किस्मत बदलेगी वोट से…! छोडकर सारे काम,चलो करे मतदान…! अशा विविध घोषवाक्यातून बालचिमुकल्यांनी जनजागृती केली.
या अभियानांसाठी जिल्हाधिकारी वर्षा घुगे-ठाकुर, सहाय्यक निवडणूक अधिकारी मंजुषा लटपटे,अहमदपूरचे तहसीलदार शिवाजी पालेपाड व चाकूरचे तहसीलदार नरसिंग जाधव, गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे, जयसिंह जगताप यांच्या मार्गदर्शना खाली मतदारसंघात जनजागृती कार्यक्रम करण्यात येत असून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वीपचे सदस्य महादेव खळुरे,शिवकुमार गुळवे, मोहन तेलंगे,नागनाथ स्वामी,बस्वेश्वर थोटे,पुरुषोत्तम काळे यांच्या सह गावातील मतदार बंधू भगिणिनी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाला उपस्थितीत होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *