महेश अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेस तीन कोटीचा नफा

0
महेश अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेस तीन कोटीचा नफा

महेश अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेस तीन कोटीचा नफा

अहमदपूर (गोविंद काळे) : महेश अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, अहमदपूर ने प्रगतीचा आलेख सातत्याने चढता ठेवला असुन मार्च २०२४ अखेर बँकेस निव्वळ तीन कोटीचा नफा झाला आहे.
या विषयीची माहीती की, मार्च २४ अखेर महेश बँकेचे भाग भांडवल १५६९ कोटी, ठेवी ४०३ कोटी, कर्जवाटप २४४ कोटी, सीडी रेशो ६०.४३% तसेच निव्वळ एनपीए शून्य टक्का आहे. बँकेला मार्च २०२४ अखेर ३ कोटी ९ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. बँकेने ६५० कोटी रुपयाचा व्यवसायाचा पल्ला गाठला आहे.
या यशात बँकेचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब जाधव, संस्थापक संचालक आमदार बाबासाहेब पाटील, उपाध्यक्ष निवृत्तीराव कांबळे ,बँकेचे व्यवस्थापन मंडळ, सर्व सन्माननीय संचालक ,बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक सिद्राम रंदाळे, प्रभारी व्यवस्थापक प्रशांत मांडवकर, बँकेचे शाखा व्यवस्थापक,अधिकारी, कर्मचारी, पिग्मी एजंट, बँकेचे सभासद, ठेवीदार,खातेदार यांचा सिंहाचा वाटा आहे. बँकेने रिझर्व बँक ऑफ इंडिया व सहकार खात्याचे तंतोतंत नियमांचे पालन करून बँकेचे ठेवीदार, सभासद व खातेदार यांची मने जिंकली आहेत.
कर्मचाऱ्यांना त्यांच्या आर्थिक अडचणी भागवण्यासाठी बँक नेहमीच अग्रेसर राहिली असुन कर्मचाऱ्यांना पाच टक्के दरात वाहन कर्ज, बांधकाम कर्ज सहा टक्के, तसेच कॅश क्रेडिट सुविधा, सुट्ट्यांचा पगार, बोनस ३१.२५% प्रमाणे देऊन कर्मचाऱ्यांसाठी बँकेच्या संचालक मंडळाने नेहमीच सहानुभूती दाखवून प्रोत्साहित केले आहे. बँकेचा चालू आर्थिक वर्षात पुणे शहरात शाखा लवकरच चालू होणार आहे. बँकिंग व्यवसाया सोबतच सामाजिक बांधिलकी बँकेने जोपासली आहे.या यशामुळे बँकेचे सभासद, खातेदार ,हितचिंतक, नौकरदार व व्यापारी या सर्वांचे बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक सिद्राम रंदाळे व प्रभारी व्यवस्थापक प्रशांत मांडवकर यांनी ऋण व्यक्त करून आभार मानले आहेत.
त्याचबरोबर नवीन आर्थिक वर्षात बँकेची याहीपेक्षा अधिक चांगल्या सुविधा बँकेकडून सभासदांना प्राप्त व्हावीत अशा प्रकार च्या अपेक्षा व्यक्त करून बँकेचे जेष्ठ मार्गदर्शक संचालक आमदार बाबासाहेब पाटील यांनी बँकेला शुभेच्छा देऊन सर्व सभासदांचे आभार मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *