लोकसभेच्या निवडणुकीचे कामे शिक्षकांनी तत्परतेने व पारदर्शीपणे करावे – सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मंजुषाताई लटपटे

0
लोकसभेच्या निवडणुकीचे कामे शिक्षकांनी तत्परतेने व पारदर्शीपणे करावे - सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मंजुषाताई लटपटे

लोकसभेच्या निवडणुकीचे कामे शिक्षकांनी तत्परतेने व पारदर्शीपणे करावे - सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मंजुषाताई लटपटे

अहमदपूर (गोविंद काळे) : भारतीय शासन प्रणालीमध्ये लोकशाहीला अनन्यसाधारण महत्त्व आहे म्हणून सर्वांनी देशाचा अभिमान असलेल्या लोकशाहीच्या उत्सवांमध्ये मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी असलेल्या शिक्षकांनी मन लावून तत्परतेने व पारदर्शीपणाने काम करावे असे आग्रही प्रतिपादन
सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्रीमती मंजुषाताई लटपटे यांनी केले.
त्या दि.07 रोजी प्रसाद गार्डन मंगल कार्यालयात आयोजित 41 लातूर (अ.जा) सार्वत्रिक लोकसभा मतदारसंघ, 236 अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्राध्यक्ष/ मतदान अधिकारी यांच्या पहिल्या प्रशिक्षण शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर संपर्क अधिकारी तथा उप जिल्हाधिकारी श्री नितीन वाघमारे जिल्हाधिकारी कार्यालय लातूर तसेच अहमदपूरचे तहसीलदार शिवाजी पालेपाड,चाकूर चे तहसीलदार नरसिंग जाधव, यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी श्रीमती मंजुषा ताई लटपटे पुढे बोलताना म्हणाल्या की, मतदानाच्या या प्रक्रियेमध्ये सहभागी असलेल्या स्त्री-पुरुष कर्मचाऱ्यांनी आपल्याकडे दिलेली जबाबदारी अत्यंत निष्ठेने व प्रामाणिकपणे पार पाडावी. यास इतर निवडणुकीच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण सूचना त्यांनी यावेळी पी पी टी च्या माध्यमातून मतदान कसे काटेकोरपणे करून घेण्यात येणार असल्याचे अभ्यास पूर्ण सांगितले.
यावेळी लातूर जिल्हा संपर्क अधिकारी श्री नितीन वाघमारे म्हणाले की, या उत्सवात सहभागी कर्मचाऱ्यांनी सर्व माहिती अभ्यासपूर्ण आत्मसात करावी असे जाहीर आवाहन केले.
यावेळी दुपारच्या सत्रात महात्मा गांधी महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये प्रत्यक्ष ई व्ही एम मशीन हाताळण्यासाठी तेरा हॉलमध्ये क्षेत्रीय अधिकारी व मास्टर ट्रेनर यांच्या माध्यमातून सर्वांना समजावून सांगण्यात आले .
सकाळच्या सत्रात एकूण 1264 कर्मचारी त्या पैकी 1226 उपस्थित तर 38 कर्मचारी अनुपस्थित होते.
सदरचे प्रशिक्षण जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी वर्षाताई ठाकूर घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. यावेळी या प्रशिक्षण शिबिरामध्ये चाकूरचे तहसीलदार नरसिंग जाधव, अहमदपूरचे तहसीलदार शिवाजी पालेपाड यांचे पी पी टी च्या द्वारे संबंधित कर्मचाऱ्यांना निवडणूक वेगवेगळ्या विषयावर प्रशिक्षण दिले.
या समयी मास्टर ट्रेनर म्हणून केशव काचे आणि अंकुश आडे यांनी काम पाहिले.
या लोकशाहीच्या उत्सवांमध्ये मतदान क्षेत्रीय अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, सहाय्यक मतदान अधिकारी, इतर मतदान अधिकारी, यांच्यासह महिला व पुरुष शिक्षक आणि महसूल प्रशासनाचे कर्मचारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
प्रशिक्षण शिबिर यशस्वी करण्यासाठी महसूल प्रशासनाच्या सर्व अधिकारी,कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *