अनुसूचित जातीचे बोगस प्रमाणपत्र जोडून शासनाची फसवणूक ; नायब तहसीलदार मधुकर क्षीरसागर यांच्यावर कार्यवाहीसाठी मनोहर पाटील यांचा आत्मदहनाचा इशारा
अहमदपूर (प्रतिनिधी) : अनुसूचित जातीचे बोगस प्रमाणपत्र जोडून अनुसूचित जाती जमाती अन्याय प्रतिबंधक अधिनियमाचा अवमान करुन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी नायब तह सीलदार मधुकर क्षीरसागर यांचेवर कार्यवाही न केल्याने व्यथित होवून आत्मदहन करण्याचा इशारा एका निवेदनाव्दारे मनोहर माणिकराव पाटील यांनी जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय लातूर यांच्या मार्फत मुख्यमंत्री, गृहमंत्री महाराष्ट्र राज्य, विभागीय आयुक्त, क्रीडामंत्री, सचिव महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडे केला आहे.
निवेदनात असे म्हटले आहे की, मी अर्जदार मनोहर माणिकराव पाटील रा. अहमदपूर यांनी दि. ०७/०३/२०२४ रोजी आपल्या कार्यालयाकडे नायब तहसीलदार क्षीरसागर हे मराठा ओपन समाजाचे असताना त्यांनी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कलमाचे उल्लंघन करुन शासनास स्वतः अनुसूचित जाती जमातीचे असल्याचे खोटे कागदपत्र सादर करुन आपल्या कार्यालयातील अधिकाऱ्याशी संगनमत करुन बेकायदेशीर पदोन्नती घेतली आहे. त्यांचे विरुद्ध तात्काळ कार्यवाही करावी वगैरे मजकूराच्या माझ्या तक्रारीवर आजपर्यंत प्रशासनाने कुठलीही कार्यवाही केलेली नाही. सदर नायब तहसीलदार यानी अनुसूचित जाती जमाती अन्याय प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केल्याने व शासनाची फसवणूक केल्याने त्याचे विरुद्ध कलम ४२० भा.दं.वि., अॅट्रासिटी कायद्याप्रमाणे तसेच त्याना पाठीशी घालणाऱ्या कर्मचाऱ्या विरुद्ध पण योग्य ती कायदेशीर कारवाई करावी.
ज्या अर्थी आदर्श आचार संहिता निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांच्या पारदर्शक तत्वानुसार कुठलाही वर्ग-२ श्रेणीतील कर्मचारी त्यांच्या मुळ तालुक्यात निवडणूकीत सेवा देवू शकत नाही त्या अर्थी नायब तहसीलदार मधुकर क्षीरसागर यांचे मूळ गाव अंधोरी ता. अहमदपूर हे असताना आचारसंहितेच्या काळात त्यांची बदली अहमदपूर येथे करण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यांचे येथील काँग्रेस पक्षाचे पदाधिका-याशी जवळीकता असल्याने व निवडणूकीच्या काळात ते. हेराफेरी करण्याची शक्यता असल्याने त्यांची बदली इतर जिल्ह्यात करण्यात यावी. ही मागणी करुनसुद्धा आजपर्यंत कारवाई न झाल्याने मी व्यथित होवून दि. २५/०४/२०२४ रोजी मी आत्मदहन करणार आहे याची नोंद घ्यावी. असा निवेदनात इशारा देण्यात आला आहे
सदरील निवेदनाच्या प्रतिलिपी गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांना देण्यात आल्या आहेत.