अहमदपुरात गुणाले कॉम्प्लेक्सला आग ; आगीत ११ दुकाने जळून खाक २.५ ते ३ कोटीचे नुकसान
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील गुणाले कॉम्प्लेक्सला दि ०७ एप्रि रोजी रविवारी सकाळी पहाटे ०३ : ३० वाजण्याच्या सुमारास अचानक भिषण आग लागुन कॉम्प्लेक्स मधील मशनरी स्टोअर्स,इस्त्री दुकान, मेडिकल स्टोअर्स, डेंटल क्लिनिक, स्विट मार्ट, किराणा दुकान तीन लेडीज एम्पोरिअम सह जवळपास ११ दुकाने जळून खाक झाली असुन सुमारे २.५ ते ३ कोटी रूपयांचे अंदाजे नुकसान झाले आहे यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही सुदैवाने बाजुच्या दुकानात झोपलेले ७ कामगार बालंबाल बचावले सदरील घटनेची अहमदपूर पोलीसात नोंद करण्यात आली आहे
अहमदपूर नांदेड हायवेवर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील गुणाले कॉम्प्लेक्स मधील ११ दुकानाला दि ०७ एप्रि रोजी रविवारी पहाटे ३:३० वाजण्याच्या सुमारास अचानक भीषण आग लागुन कॉम्प्लेक्स मधील मशनरी स्टोअर्स,इस्त्री दुकान, मेडिकल स्टोअर्स, डेंटल क्लिनिक, स्विट मार्ट, किराणा दुकान तीन लेडीज एम्पोरिअम सह जवळपास ११ दुकाने जळून खाक झाली असुन दुकानात असलले सामान जळून खाक होऊन सुमारे २.५ ते ३ कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे या आगीत कुठलीही जिवीत हानी झाली नाही सुदैवाने बाजुच्या दुकानात झोपलेले ७ कर्मचारी बालंबाल बचावले सदरील घटनेची अहमदपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. शॉर्टसर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.सुमारे पंधरा फूट उंचीवर आगीच्या ज्वाळा भडकत होत्या. आगीचे रौद्ररूप लक्षात घेऊन नागरिकांनी दुकानातील साहीत्य बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण अचानक लागलेल्या आगीने दुकानांचा अक्षरशः कोळसा झाला. रविवारी ८ वाजेपर्यंत जळालेल्या दुकानांमधून धुराचे लोट बाहेर पडत होते.
या आगीत ज्ञानेश्वर गंगाधर पस्तापुरे (मेडिकल ) १० लाख रू, शिलानंद किशोर पाटील ( शेती अवजारे ) ३० लाख रु , गोविंद तुळशीराम तेलंगे ( कपड्याची इस्त्री ) ३.५० लाख रू, डॉ. सुनिल गुणवंत कच्छवे ( समर्थ टेंडल क्लिनिक ) २५ लाख रू, इमरोज सलीम पटवेगर ( ममता ब्युटी कलेक्शन ) ३५ लाख रु, अफरोज सलीम पटवेकर ( मेमसाब ब्युटी कलेक्शन ) ३० लाख रु, अमोल गोविंद वंगलवार ( माऊली लेडिज एम्पोरिअम ) २५ लाख रू, यतिन रमेश जागाणी (मारोती स्विट मार्ट ) १९ लाख रु, सतीष हरीभाऊ भदाडे ( भदाडे लेडिज एम्पोरिअम )२६ लाख रु, साईनाथ भिमराव अंकुलवार( झेरॉक्स सेंटर अॅण्ड जनरल ) १७ लाख रू, भिमराव नरहरी अकुलवार ( लक्ष्मी नारायण किराणा २० लाख रू दुकानातील माल पुर्णतहा: जळून खाक झाला असुन या सर्वांचे मिळून अंदाजे २.५ ते ३ कोटी नुकसान झाले आहे
आगीची माहिती मिळताच शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांनी घटनास्थळी जाऊन नगरपालिका अग्नीशमन दल अहमदपूर, उदगीर, चाकुर, लोहा या ठिकाणाहून अग्निशमन वाहनांना पाचारण केले व तब्बल चार तास थांबुन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन तसेच व्यापाऱ्यांना सहकार्य केले यात रेड्डी यांचा हात व मानेखाली काही भागावर आगीमुळे भाजुन जखमा झाल्या आहेत पहाटेची वेळ असल्याने शिवाय मुख्य मार्ग असूनही वाहतूक नसल्याने आग आटोक्यात आणणे सोपे झाले.
अग्निशमन विभागाच्या ड्रायव्हर कम ऑपरेटर अजित अंगद लाळे, प्रभारी ऑफिसर कैलास रोहिदास सोनकांबळे, प्रशांत गायकवाड , प्रकाश जाधव आदी कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून मोठ्या शर्थीने आग आटोक्यात आणली तरी आतील साहित्य मात्र जळून खाक झाले. दुकानांमधील रोकडदेखील भक्ष्यस्थानी पडली. ती रक्कम नेमकी किती होती, याची अधिकृत माहिती मिळाली नाही.
सुमारे तीन तासाहून अधिक काळ आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. आगीची घटना घडल्यानंतर पोलीस प्रशासनातील अधिकारी कर्मचारी तसेच महावितरणच्या कर्मचाऱ्यांनीदेखील घटनास्थळी धाव घेत खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील वीज खंडित केली. खासदार सुधाकर श्रंगारे , माजी मंत्री बाळासाहेब जाधव , भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख , भाजपा प्रवक्ते गणेशदादा हाके, यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, उद्योजक, व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी, राजकीय मंडळींनी घटनास्थळी भेट दिली. मुख्य मार्गावरच ही घटना घडल्याने दिवसभर या ठिकाणी पाहणाऱ्यांची गर्दी होती. पाहणाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली तर दुकानमालकांना हुंदके आणि अश्रू आवरता आले नाहीत.
फटाक्यासारखा आवज व धावपळ
आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या दुकानातून पहाटे फटाक्यांसारखा जोरदार आवाज होऊ लागल्यानंतर शेजारील लोकांना जाग आली. बाहेर येऊन पाहताच ११ ही दुकाने आगीने वेढली होती. यानंतर आग आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू झाली.
संसार उघड्यावर
आगीच्या घटनेत ११ ही दुकाने जळून खाक होऊन मोठे नुकसान झाले. यातील काहींनी कर्ज काढून दुकानात माल भरला होता. या दुकानावरच काहींची रोजीरोटी सुरू होती. आगीच्या घटनेने सर्व हिरावून नेल्याने मोठा आर्थिक फटका या दुकानदारांना बसला आहे.