रमजान चे उपवास “रोजा” मनुष्याला संयम आणि त्यागाची शिकवण देतात – प्रा. गोविंद शेळके

0
रमजान चे उपवास "रोजा" मनुष्याला संयम आणि त्यागाची शिकवण देतात - प्रा. गोविंद शेळके

रमजान चे उपवास "रोजा" मनुष्याला संयम आणि त्यागाची शिकवण देतात - प्रा. गोविंद शेळकेरमजान चे उपवास "रोजा" मनुष्याला संयम आणि त्यागाची शिकवण देतात - प्रा. गोविंद शेळके

सकल मराठा समाजाच्या वतीने अहमदपूरात इफ्तार पार्टी

अहमदपूर (गोविंद काळे) : पवित्र रमजान चे उपवास म्हणजेच ” रोजा ” मनुष्याला संयम आणि त्यागाची शिकवण देतात रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये, मुस्लिम बांधवानद्वारे रोजाच्या माध्यमातून उपवास केले जातात. रोजा मुस्लिम बांधवांना संयम, त्याग, मनःशांती बहाल करतात त्याद्वारे समाजामध्ये मुस्लिम बांधव आपल्या वर्तणुकीतून एक आदर्श निर्माण करत असतात त्यामुळे रमजानच्या पवित्र महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले असुन रमजान चे उपवास म्हणजेच रोजा मनुष्याला संयम आणि त्यागाची शिकवण देतात असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे लातूर जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. गोविंद शेळके यांनी केले.
ते अहमदपूर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या ईफ्तार पार्टीत बोलत होते. ते पुढे बोलताना म्हणाले, मराठा-मुस्लिम बांधवांमध्ये एकोपा निर्माण होण्याबरोबरच दोन्ही समाजांना जोडणारा दुवा म्हणून इफ्तार पार्टीचे आयोजन केले. त्यामुळे एकमेकांच्या सुखदु:खांत सामील होता येते. अशा प्रकारचे कार्यक्रम वारंवार झाल्यास दोन्ही समाजांतील एकोपा वाढीस मदत होईल, असे यावेळी प्रा. गोविंदराव शेळके यांनी सांगीतले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा मराठा सेवा संघाचे लातूर जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.गोविंदराव शेळके, प्रा. दत्ता गलाले, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष प्रा. नाना कदम, प्रा. रोहीदास कदम, देवानंद मुळे, शिवशंकर लांडगे, सिद्धार्थ दापके, मुकेश पाटील, चोथवे, यांच्यासह मोसीन बायजीत, वाजीद शेख, रहिमखान पठाण, कालिमोद्दीन अहमद, बाबुभाई रुईकर अजहर बागवान, अय्याज शेख, नाजीम शेख, नगरसेवक जावेद बागवान जावेद फकीर साब, आसिफ पठाण, अहमद तांबोळी, जिलाणी गुत्तेदार, अॅड. सादीक शेख,इलाही बागवान, नबी शेख, सहअसंख्य मराठा व मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *